‘ब्लड फॉर महाराष्ट्र' मध्ये रक्तदानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:31 AM2021-04-21T04:31:19+5:302021-04-21T04:31:19+5:30

चिपळूण : राष्ट्रवादी युवक बेसिक, विद्यार्थी आणि सर्व सेल्सतर्फे शहरातील अपरांत हॉस्पिटल येथे ‘ब्लड फॉर महाराष्ट्र’ या टॅग लाईनखाली ...

Spontaneous response to blood donation in ‘Blood for Maharashtra’ | ‘ब्लड फॉर महाराष्ट्र' मध्ये रक्तदानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

‘ब्लड फॉर महाराष्ट्र' मध्ये रक्तदानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

Next

चिपळूण : राष्ट्रवादी युवक बेसिक, विद्यार्थी आणि सर्व सेल्सतर्फे शहरातील अपरांत हॉस्पिटल येथे ‘ब्लड फॉर महाराष्ट्र’ या टॅग लाईनखाली आयोजित रक्तदान शिबिराला चिपळूणकारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ९२ जणांनी रक्तदान केले.

महाराष्ट्रामधील कोरोनाचे सावट वाढत असल्याने रक्ताचा साठा कमी झाला आहे. हीच गरज ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर आयोजित केले होते. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या रक्तदान शिबिराला विविध संस्थानचे सहकार्यही मिळाले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, विविध शिक्षक संघटना व जनकल्याण रक्तपेढी अशा अनेक संस्थांनी सहकार्य केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सिद्धेश लाड, मनोज जाधव, विश्वनाथ कांबळे, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी अमोल टाकळी यांनी मेहनत घेतली.

Web Title: Spontaneous response to blood donation in ‘Blood for Maharashtra’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.