तवसाळ येथील प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:33 AM2021-09-25T04:33:45+5:302021-09-25T04:33:45+5:30

गुहागर : राष्ट्रीय मास्तिकी विकास मंडळ व मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा ...

Spontaneous response to training at Tavasal | तवसाळ येथील प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

तवसाळ येथील प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

गुहागर : राष्ट्रीय मास्तिकी विकास मंडळ व मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मूल्यवर्धित मत्स्य पदार्थनिर्मिती या विषयावर तवसाळ (ता. गुहागर) येथे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एकूण २५ लाभार्थींनी सहभाग घेतला हाेता.

या एकदिसीय कार्यक्रमाचे उद्घाटन तवसाळ येथील कांदळवन समितीचे अध्यक्ष नीलेश सुर्वे, उपजीविका तज्ज्ञ वैभव बाेंबले, कांदळवन प्रकल्प समन्वयक चिन्मय दामले, रोहित बिर्जे व प्रणव बांदकर आणि मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान विभागप्रमुख डाॅ. आशिष मोहिते यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.

या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक डाॅ. अजय देसाई, विभागप्रमुख डाॅ. आशिष मोहिते आणि डाॅ. दबीर पठाण यांनी मार्गदर्शन केले. दुपारनंतरच्या कार्यक्रमामध्ये प्रा. श्रीकांत शारंगधर व विनायक विश्वासराव यांनी विविध मूल्यवर्धित पदार्थांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी काेकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजय सावंत व विस्तार शिक्षण संचालक डाॅ. संजय भावे आणि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ. प्रकाश शिंगारे यांचे सहकार्य लाभले. तसेच डाॅ. जे. एम. कोळी, साईप्रसाद सावंत यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिले. या वेळी सर्व लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, मूल्यवर्धित पुस्तिकाचे वाटप करण्यात आले. नीलेश सुर्वे यांनी आभार मानले.

Web Title: Spontaneous response to training at Tavasal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.