संकल्प अभिनव फाउंडेशनतर्फे क्रीडा साहित्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:27 AM2021-04-03T04:27:39+5:302021-04-03T04:27:39+5:30
khed-photo22 चिपळूण येथील छात्रावासातील विद्यार्थ्यांना संकल्प अभिनव फाउंडेशनतर्फे क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी व छात्रावासाचे विद्यार्थी ...
khed-photo22 चिपळूण येथील छात्रावासातील विद्यार्थ्यांना संकल्प अभिनव फाउंडेशनतर्फे क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी व छात्रावासाचे विद्यार्थी उपस्थित हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : चिपळूण येथील रेणुकामाता नागा विद्यार्थिनी छात्रावास व रा.स्व. संघ जनकल्याण समितीचा उपक्रम म्हणून पूर्वांचल राज्यातील विद्यार्थिनींना पुणे येथील संकल्प अभिनव फाउंडेशनतर्फे क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी फुटबॉल खेळण्यासाठी लागणारे बूट, फुटबॉल, दोन बॅटमिंटनचे सेट, फ्लयिंग डिशचे २ सेट, दोरीउडीचे आणि रिंगचे दोन सेट असे साहित्य प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला क्रीडा साहित्य संकल्प अभिनव भारत फाउंडेशन संस्थेचे स्वयंसेवक भाऊसाहेब आव्हाड, छात्रावास प्रकल्प प्रमुख प्राजक्ता ओक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्राजक्ता ओक यांनी छात्रवासाच्या कामकाजाची माहिती दिली व संकल्प अभिनव भारत फाउंडेशन संस्थेच्या संचालकांचे आभार मानले.