SSC Result 2023: १०० पैकी १०० गुण, राज्यातील १५१ विदयार्थ्यांमध्ये कोकणच्या कन्येचा समावेश
By मेहरून नाकाडे | Published: June 2, 2023 05:49 PM2023-06-02T17:49:30+5:302023-06-02T17:50:01+5:30
मिस्त्री हायस्कूलच्या इतिहासात अशा प्रकारे उत्तुंग यश मिळविणारी पहिली विद्यार्थिनी
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल झाला झाला आहे. या परीक्षेमध्ये मिस्त्री हायस्कूलची विद्यार्थिनी सुमय्या मोहियुद्दीन सय्यद हिने शंभर टक्के गुण मिळविले आहे. प्रशालेच्या इतिहासात अशा प्रकारे उत्तुंग यश मिळविणारी पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.
संपूर्ण राज्यात १०० टक्के मार्क्स घेणारे एकूण १५१ विदयार्थी आहेत. त्यामध्ये सुमय्याचा समावेश आहे. यापूर्वीही सुमय्या सय्यद या विद्यार्थिनीने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत (२०१८) संपूर्ण कोकण विभागात उर्दू माध्यमात प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळवला होता.
तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक जुबेर गडकरी, तसेच तालिमी इमदादिया कमिटीचे अध्यक्ष अब्दुल हमीद मिस्त्री, सचिव तनवीर मिस्त्री, सहसचिव जाहीर मिस्त्री ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व संस्थेचे खजिनदार निसार लाला, संस्थेचे संचालक शकील मजगावकर, रफिक मुकादम, साबीर मजगावकर, प्रशालेचे पर्यवेक्षक मुश्ताक आगा यांनी सुमय्या, तिच्या पालकांचे व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचेही अभिनंदन केले आहे.