Ratnagiri: करंबेळे येथे एसटी बस दरीत उलटली, ११ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 01:48 PM2024-06-21T13:48:33+5:302024-06-21T13:49:34+5:30
देवरुख: देवरुख- संगमेश्वर एसटीबस दरीत पलटी होऊन झालेल्या अपघातात ११ प्रवाशी जखमी झाले. करंबेळेनजीक काल, गुरुवारी हा अपघात झाला. ...
देवरुख: देवरुख- संगमेश्वर एसटीबस दरीत पलटी होऊन झालेल्या अपघातात ११ प्रवाशी जखमी झाले. करंबेळेनजीक काल, गुरुवारी हा अपघात झाला.
देवरुख-संगमेश्वर राज्यमार्गावर देवरुखातुन सुटलेली एसटीबस गाडी क्रमांक (एमएच २० बीएल २११२) ही बस ३.३० ला देवरुखहुन संगमेश्वरला जात असताना बसचालक निळोबा मुंडे याचे बस वरील नियंत्रण सुटले. करंबेळे मोरीच्या पुढील बाजुस ही बस संजय महाडीक यांच्या कंपाउंड मध्ये रस्ता सोडुन २० फुट दरीत जाऊन कोसळली. यात ११ प्रवाशी जखमी झाले.
दुर्वा मनोज गोसावी (वय २९ रा. मुचरी गोसावीवाडी), संतोष रावजी कुवळेकर (५५ रा निवळी), सुगंधा रघूनाथ सोळकर (५० लोवले पडयेवाडी), सायली संजय गुरव (३५ पिरंदवणे), काव्या संजय गुरव (१४) शिवाजी सीताराम पवार (६९ कारभाटले), अभिजित धोंडीराम येडके (रा देवरुख), रमाकांत रामदास दुर्गवले (१८, मुर्तवडे), अर्चना अशोक ओक (चिपळूण), वैशाली विष्णू पडवेकर (फणसवणे), अमृता आशिष भिडे (३९) हे जखमी झाले.
जखमींना ग्रामस्थांनी तात्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी देवरुख आणि संगमेश्वर पोलिस स्थानकाच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. देवरुख पोलिस आणि देवरुख आगाराचे व्यवस्थापक हनुमंत फडतरे आणि अधिकारी यांनी पंचनामा केला. बस पलटी झाल्याचे वृत्त कळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. माजी राज्यमंत्री रविंद्र माने, नेहा माने यांनी अपघात स्थळी भेट देऊन पाहणी केली.