चिपळुणातील अपघातात एसटी चालक गंभीर;
By संदीप बांद्रे | Published: September 8, 2023 09:00 PM2023-09-08T21:00:55+5:302023-09-08T21:01:06+5:30
संबंधित तरुण येथील आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत आहे.
चिपळूण : शहरातील पागनाका येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता आयशर ट्रक व दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. संबंधित तरुण येथील आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत आहे.
विशाल शंकर शिंदे (३५, पाटण, सध्या कापसाळ, चिपळूण) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. देवगडहून मुंबईकडे निघालेल्या आयशर ट्रकची पागनाका येथे समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये विशाल शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तो जागीच बेशुद्ध पडला होता. त्याला तात्काळ कामथे रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा उशिरा पर्यंत सुरू होता.
विशाल शिंदे हा चिपळूण आगारात एसटी चालक म्हणून काम करतो. कापसाळ येथील यामा शोरूम नजीक राहतो. या घटनेची माहिती मिळताच एसटी कर्मचाऱ्यांनीही कामथे रुग्णालयाकडे धाव घेतली.