गुहागर-विजापूर मार्गावर एस.टी. चिखलात रुतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:26+5:302021-07-12T04:20:26+5:30
गुहागर : गुहागर-विजापूर या नव्याने होणाऱ्या रस्त्याअंतर्गत शृंगारतळी जायका हॉटेलसमोर गुहागर आगाराची रात्री ८ वाजता सुटणारी गुहागर-बोरिवली एस.टी. बस ...
गुहागर : गुहागर-विजापूर या नव्याने होणाऱ्या रस्त्याअंतर्गत शृंगारतळी जायका हॉटेलसमोर गुहागर आगाराची रात्री ८ वाजता सुटणारी गुहागर-बोरिवली एस.टी. बस चिखलात फसली. तब्बल १७ तासांनंतर जेसीबीच्या साहाय्याने ही एस.टी. बस बाहेर काढण्यात आली.
गुहागर-विजापूर रस्त्याअंतर्गत मोडकाआगर पूल ते शृंगारतळी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याच्या बाजूने भराव टाकण्यात आल्याने अद्याप हा भाव चांगला बसलेला आहे. गेले दोन दिवस पावसाने जोर केल्याने हा भाग नरम पडला आहे, याचाच अंदाज न आल्याने गुहागर आगारातून रात्री ८ वाजता सुटणारी गुहागर-बोरिवली (एमएच १४, बीटी २६६२) एस.टी. बस रस्त्याच्या डाव्या बाजूला चिखलात फसली. सुदैवाने या बसमध्ये प्रवास करणाऱ्या सात प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नाही. लगेचच दुसरी बस पाठवून या प्रवाशांना रवाना करण्यात आले. रविवारी दुपारपर्यंत ही बस काढण्यात आली नव्हती. याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी रस्त्याच्या मनीषा कन्स्ट्रक्शन कंत्राटदाराला फोन लावून तातडीने जेसीबी बोलावून गाडी बाहेर काढण्यात आली.
--------------------------------
शृंगारतळी येथील जायका हॉटेल समोर गुहागर-बाेरिवली एस.टी. चिखलात फसली हाेती.