भरघोस वेतनवाढीबद्दल एसटी कामगार सेनेचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 04:00 PM2018-06-07T16:00:37+5:302018-06-07T16:00:37+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७०व्या वर्धापनदिनी एसटी कामगारांना महामंडळाने वेतनवाढीची भेट देऊ केली आहे.

ST Workers demand increase in salary | भरघोस वेतनवाढीबद्दल एसटी कामगार सेनेचा जल्लोष

भरघोस वेतनवाढीबद्दल एसटी कामगार सेनेचा जल्लोष

Next

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७०व्या वर्धापनदिनी एसटी कामगारांना महामंडळाने वेतनवाढीची भेट देऊ केली आहे. त्याबद्दल महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय कार्यशाळेसमोर जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करून वाद्यवृंदाच्या तालावर नाचून आनंद व्यक्त केला.

कामगारासांठी २०१६-२०२० साठी ४.८४९ कोटी रुपयांची भरघोस वेतनवाढ केली आहे. एसटीच्या एक लाख पाच हजार ६७९ कर्मचाऱ्यांना ३२ ते ४८ टक्क्यांपर्यंत वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. नियमित वेतश्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात किमान ४,६१९ रुपये ते कमाल १२,०७१ रुपये इतकी वाढ होणार आहे. पूर्वी पाच वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना ४ वेतनवाढ व तीन वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना २ वेतनवाढ, या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता किमान ४,६१९ ते कमाल ९,१०५ रुपये वाढ होणार आहे. १ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१८ या कर्मचाऱ्यांच्या २६ महिन्यांच्या थकबाकीची रक्कम १,१९७ कोटी रुपये ४८ समान हप्त्यांमध्ये अदा करण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या पूरक भत्त्यांमध्येही वार्षिक ४५ कोटीवरून तब्बल २५० कोटींपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वेतननिश्चितीनंतर जुलै २०१८पासून वेतनवाढ कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रतिमहिना ७५० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलांना महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनेंतर्गत बिनव्याजी अग्रीम रक्कम देण्यात येणार आहे. वेतनवाढीचे एसटी कामगार सेनेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे विभागीय कोषाध्यक्ष संतोष शेट्ये, राज्य कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, सचिन वायंगणकर, बाबा पाडाळकर, मंगेश देसाई, शैलेश देसाई, शैलेंद्र सुर्वे यावेळी उपस्थित होते.

Web Title: ST Workers demand increase in salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.