चिपळूण-मिरज बससेवा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:21 AM2021-07-09T04:21:18+5:302021-07-09T04:21:18+5:30

चिपळूण : चिपळूणातून मिरज येथे नियमित वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे चिपळूण-मिरज अशी बससेवा सुरू करावी, ...

Start Chiplun-Miraj bus service | चिपळूण-मिरज बससेवा सुरू करा

चिपळूण-मिरज बससेवा सुरू करा

Next

चिपळूण : चिपळूणातून मिरज येथे नियमित वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे चिपळूण-मिरज अशी बससेवा सुरू करावी, अशी मागणी ॲड. ओवेस पेचकर यांनी येथील आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप आणि कालुस्ते येथील रहिवासी आजारपणामुळे औषधोपचारासाठी मिरज येथे नियमित जात असतात. त्यामुळे गोवळकोट ते मिरज एसटी बससेवा (शिवनेरी) सुरू झाल्यास चांगले प्रवासी मिळतील. ही बस नियमितपणे सुरू राहील. येथील प्रवाशांनाही त्याचा दिलासा मिळेल. त्यामुळे चिपळूण आगारातून आरामदायी एस.टी. बससेवा (शिवनेरी बस) सुरू करण्यात यावी. ही बस सकाळी ६ वाजता सोडून परतीचा प्रवास सायंकाळी ७ वाजता असावा. आगाराच्या सोयीप्रमाणे ही बससेवा वन-स्टॉप किंवा नॉन-स्टॉप प्रवास अशी सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

080721\1854-img-20210708-wa0019.jpg

चिपळूण- मिरज बस सेवा सुरू करावी

Web Title: Start Chiplun-Miraj bus service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.