रायपाटण ग्रामीण रूग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:32 AM2021-04-02T04:32:39+5:302021-04-02T04:32:39+5:30
पाचल : कोरोनाची लागण रोखण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक जलदगतीने राबविण्यात येत आहे. मात्र, राजापूर तालुक्यात लसीकरण मोहीम अतिशय संथगतीने ...
पाचल : कोरोनाची लागण रोखण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक जलदगतीने राबविण्यात येत आहे. मात्र, राजापूर तालुक्यात लसीकरण मोहीम अतिशय संथगतीने सुरू आहे. सद्यस्थितीत तालुक्याच्याच ठिकाणी लसीकरण करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील ६० वर्षावरील नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. पाचल पूर्व भागासाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत तालुक्याच्या ठिकाणी ४० ते ५० किलाेमीटर अंतरावर जाऊन लसीकरणाचा लाभ घ्यावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अत्यंत गैरसोयीचे व त्रासाचे आहे. आरोग्य विभागाने या अगोदरच रायपाटण ग्रामीण रूग्णालयात हे लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक होते. लसीबाबत अनेक समज-गैरसमज आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत प्रबोधन करून जनतेच्या मनातील शंका-कुशंका दूर कराव्यात. कोरोना लसीकरण मोहिमेचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करावयाचे असेल तर ग्रामीण रूग्णालय त्याचबरोबर प्राथमिक आराेग्य केंद्रात ही लस देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, आरोग्य विभागाने लसीकरण मोहिमेबाबत योग्य नियोजन केले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.