सातपानेवाडीसाठी मिनी बससेवा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:32 AM2021-04-20T04:32:15+5:302021-04-20T04:32:15+5:30
खेड : तालुक्यातील खवटी-दिवाणखवटी-सातपानेवाडीसाठी मिनी एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी सभापती मानसी जगदाळे यांच्याकडे केली आहे. ...
खेड : तालुक्यातील खवटी-दिवाणखवटी-सातपानेवाडीसाठी मिनी एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी
ग्रामस्थांनी सभापती मानसी जगदाळे यांच्याकडे केली आहे. दिवाणखवटी=सातपानेवाडीसाठी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असून, या कामाची पाहणी करण्यासाठी सभापतींनी सातपानेवाडीला भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे एस. टी. सेवेची मागणी केली.
सातपानेवाडीतील ७ विद्यार्थी हे कॉलेजसाठी भरणे, खेड येथे जातात. तसेच काही विद्यार्थी खवटी येथे माध्यमिक शिक्षणासाठी ये-जा करतात. त्यांना एस. टी. सेवेसाठी ८ ते १० किलाेमीटर पायपीट करावी लागते. या वाडीतील मुलींचे शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून मिनी एस. टी. सेवा सुरू करावी, जेणेकरून विद्यार्थी, आजारी ग्रामस्थ व नागरिकांना त्याचा लाभ होईल. या वाडीसाठीचा रस्ता हा डांबरी असून, मोठमोठ्या गाड्यांची ये-जा सुरू आहे. या दुर्गम भागातील लोकांसाठी एसटी सेवा सुरू व्हावी म्हणून ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे.
याबाबत आमदार योगेश कदम यांच्याकडे लवकरच मागणी मांडणार असल्याचे मानसी जगदाळे यांनी सांगितले. तसेच या वाडीतील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी बससेवा सुरू होणे गरजेची असल्याचे सभापती यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश जगदाळे, सीताराम जाधव, संतोष कदम, मंगेश शेलार, काशीराम कदम, काशीराम काजारी, प्रकाश साळवी, रामचंद्र शेलार, वसंत साळवी, गोविंद शेलार, धोंडू साळवी, पांडुरंग भोसले, नाना शिंदे, विनोद शेलार, रवींद्र शिंदे, राजू साळवी, नारायण शेलार, प्रमोद जाधव उपस्थित होते.