विणीच्या हंगामाला प्रारंभ, वेळास किनारी समुद्राकडे झेपावली कासवाची ३८ पिल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 04:54 PM2023-01-13T16:54:12+5:302023-01-13T16:54:46+5:30

वेळास येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या कासव मादीने घरटे तयार केले होते

Starting the mating season, 38 turtle hatchlings rushed towards the coastal sea | विणीच्या हंगामाला प्रारंभ, वेळास किनारी समुद्राकडे झेपावली कासवाची ३८ पिल्ले

विणीच्या हंगामाला प्रारंभ, वेळास किनारी समुद्राकडे झेपावली कासवाची ३८ पिल्ले

googlenewsNext

मंडणगड : तालुक्यातील वेळास समुद्रकिनाऱ्यावर सागरी कासव संवर्धन मोहिमेअंर्तगत संरक्षित केलेल्या कासवांच्या अंड्यातून गुरुवारी (दि.१२) पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली. पहिल्या घरट्यातून बाहेर आलेली ३८ कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. यंदाच्या हंगामात सर्वप्रथम वेळास येथे कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे.

सन २०२२च्या हंगामात वनविभागाच्या माध्यमातून १५ नोव्हेंबर २०२२ रोजी वेळास येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या कासव मादीने पहिले घरटे तयार केले होते. या घरट्यामध्ये १०२ अंडी संरक्षित करण्यात आली होती. या संरक्षित अंड्यांमधून बाहेर पडलेल्या २६ पिल्लांना गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास समुद्रात सोडण्यात आली. त्यानंतर सायंकाळी आणखी १२ पिल्लांना संरक्षित समुद्रात सोडण्यात आले. हंगामातील ही पहिलेच पिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत.

ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांच्या नोंदी एम. टर्टल ॲपमध्ये केल्या जाणार आहेत. कासव संवर्धन मोहीम चिपळूणचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहायक वनरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. गुरुवारी कासवांची पिल्ले समुद्रात साेडताना दापाेलीचे परिक्षेत्र वनअधिकारी वैभव बोराटे, मंडणगडचे वनपाल अनिल दळवी, वन व्यवस्थापन समितीचे सुनील पाटील, हाेम स्टे संघटनेच्या अध्यक्ष धनश्री काचे, कासवमित्र देवेंद्र पाटील उपस्थित हाेते.

गत हंगामात १२ हजार पिल्ले समुद्राकडे

२०२१-२२चे हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर एकूण १४ हँचरीमधून ३१७ घरटी संरक्षित करण्यात आली होती. या घरट्यांमधून एकूण ३३,६०९ अंडी संरक्षित करण्यात आली होती. घरट्यातील अंड्याचे वनविभाग व कासवमित्रांकडून संरक्षण व संवर्धन करून १२,०१४ इतकी पिल्ले समुद्रात सोडण्यात आली होती.
 

Web Title: Starting the mating season, 38 turtle hatchlings rushed towards the coastal sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.