तिसंगीत राज्य उत्पादन शुल्कची हातभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:16+5:302021-07-15T04:22:16+5:30
खेड : तालुक्यातील तिसंगी-पिंपळवाडी परिसरातील नदीकिनारी गावठी हातभट्टीच्या दारू अड्डयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत ...
खेड : तालुक्यातील तिसंगी-पिंपळवाडी परिसरातील नदीकिनारी गावठी हातभट्टीच्या दारू अड्डयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत २ लाख २० हजार रूपयांचा ऐवज जप्त करत दोघांना ताब्यात घेण्यात आले. अजित अनंत भोसले, रोशन सुभाष भोसले (रा. तिसंगी- पिंपळवाडी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
यातील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या खेड विभागाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव व पथकाने ही धाड टाकली. या धाडीत गूळ व नवसागरमिश्रित रसायनाने भरलेल्या ५०० लीटरच्या १७ टाक्या जप्त करण्यात आल्या. या टाक्यांमध्ये ९ हजार लीटर रसायन आढळले. भट्टी लावण्यासाठी १ हजार लीटरची लोखंडी पत्रीटाकी, डेचके तसेच ७० लीटर गावठी दारू पथकाने जप्त केली. या पथकात दुय्यम निरीक्षक व्ही. व्ही. सकपाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर. बी. भालेकर, जवान ए. के. बर्वे यांचा समावेश होता.
---------------------------------------
खेड तालुक्यातील तिसंगी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत गावठी हातभट्टीची दारू जप्त केली.