राज्य परिवहन महामंडळ :- अनधिकृत पार्सल वाहतूक केल्यास होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 02:51 PM2019-04-19T14:51:39+5:302019-04-19T14:53:17+5:30
सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने अनधिकृत पार्सल वाहतूक करणाºया चालक, वाहकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार एस. टी.च्या रत्नागिरी विभागानेही तिकीट तपासणी
रत्नागिरी : सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने अनधिकृत पार्सल वाहतूक करणाºया चालक, वाहकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार एस. टी.च्या रत्नागिरी विभागानेही तिकीट तपासणी पथकांना सूचना देत अनधिकृत पार्सलची वाहतूक करणाºया चालक, वाहकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
बहुतांश नागरिक वस्तू, महत्त्वाची कागदपत्रं एका गावातून दुसºया गावात पोहोचविण्यासाठी एस. टी.च्या चालक अथवा वाहकाकडे देतात. यावेळी परस्पर चालक किंवा वाहकाला भेटून संबंधित वस्तू त्यांच्याकडे दिली जाते. त्यानंतर संबंधित व्यक्ती त्या गावात एस. टी. पोहोचल्यानंतर वस्तू ताब्यात घेते. मात्र, अशा पध्दतीने पार्सल वाहतूक करणे बेकायदेशीर आहे. थेट चालक, वाहकांकडे देण्यात येणाºया वस्तू नेमक्या काय असतात, याची तपासणी केली जात नाही. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. फेब्रुवारीमध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत-आपटा या बसमध्ये बॉम्ब सापडला होता. मात्र, ही गोष्ट वेळीच निदर्शनास आल्याने बॉम्बनाशक व शोधक पथकाकडून हा बॉम्ब निकामी करण्यात आला. मात्र, या घटनेमुळे एस. टी.ची सुरक्षा ऐरणीवर आल्यानेच निर्णय घेण्यात आला आहे. एस. टी.तून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असल्याने त्यांची सुरक्षा ही महामंडळाची जबाबदारी आहे. कर्जत येथील घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वाहक, चालकांकडून होणारी अनधिकृत पार्सल वाहतूक बंद करून अशाप्रकारे बेकायदा पार्सल वाहतूक करणाºया चालक, वाहकांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
माणुसकीच्या भावनेतून केली जाणारी ही पार्सल वाहतूक धोक्याची घंटा ठरल्यामुळे महामंडळाने तिकीट तपासणी पथकांना अनधिकृत पार्सल वाहतुकीबाबत कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.