आरक्षण पदोन्नतीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे शासनाकडे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:24 AM2021-06-06T04:24:18+5:302021-06-06T04:24:18+5:30
रत्नागिरी : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्, जिल्हा शाखेच्यावतीने आरक्षण पदोन्नतीसंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. हे ...
रत्नागिरी : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्, जिल्हा शाखेच्यावतीने आरक्षण पदोन्नतीसंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन शासनाला देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
या निवेदनानुसार, १८ फेब्रवारी ते ७ मे २०२१ अखेर शासन निर्णयाने मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नतीबाबत ४ महिन्यांत वेगवेगळे शासन निर्णय काढले आहेत. मुळात पदोन्नतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेचा निर्णय अद्याप प्रलंबित असताना १०० टक्के पदे कोणत्याहीप्रकारच्या आरक्षणाचा विचार न करता भरण्याबाबत शासन निर्णय काढला, ते अन्याय कारक आहे. २० एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयात ३३ टक्के राखीव प्रमाणे पदे रिक्त ठेवून इतर पदे भरण्याबाबत व १८ फेब्रवारी २०२१ अन्वये केलेली कार्यवाही रद्द करण्यात यावी, असा निर्णय झाला. ७ मे २०२१ अन्वये शासन निर्णय २० एप्रिल २०२१ अन्वये शासन निर्णय रद्द करण्यात येऊन १८ फेब्रुवारीप्रमाणे १०० टक्के पदे कोणत्याहीप्रकारच्या आरक्षणाचा विचार न करता पदोन्नती देण्याबाबत निर्णय झालेला आहे.
वारंवार शासन निर्णय बदलून मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण करीत आहे. मागासवर्गीयांना पदोन्नतीबाबत दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. त्याचा जो निकाल होईल, त्यास अधिन राहून ३३ टक्के पदोन्नतीने जागा भराव्या अन्यथा ३३ टक्के जागेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत रिक्त ठेवाव्यात. पदोन्नतीसंदर्भात सुधारित आदेश शासनाने निर्गमित करावा, अशी मागणी यात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने केली आहे. ७ मे २०२१ चा शासन निर्णय रद्द न झाल्यास नाईलाजास्तव राज्याध्यक्ष कृष्णाजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे .
हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्याकडे देताना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. बी. आर. चव्हाण (प्राध्यापक मत्स्य
महाविद्यालय रत्नागिरी, जि. प. मुख्यालय कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मोहन कांबळे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे, प्रदीप वाघोदे, नगरपरिषोचे किरण मोहिते, आरोग्य विभागाचे विजय जाधव, पाटबंधारे विभागाचे लियाकत मुजावर आदी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्याकडे देताना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. बी. आर. चव्हाण (प्राध्यापक मत्स्य
महाविद्यालय रत्नागिरी, जि. प. मुख्यालय कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मोहन कांबळे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे, प्रदीप वाघोदे, नगरपरिषदेचे किरण मोहिते, आरोग्य विभागाचे विजय जाधव, पाटबंधारे विभागाचे लियाकत मुजावर आदी उपस्थित होते.
फोटो मजकूर
रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्याकडे निवेदन देताना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. बी .आर. चव्हाण, महासंघाचे अध्यक्ष मोहन कांबळे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे, प्रदीप वाघोदे, नगरपरिषदेचे किरण मोहिते, आरोग्य विभागाचे विजय जाधव, पाटबंधारे विभागाचे लियाकत मुजावर आदी उपस्थित होते.