चिपळुणात बांधकामे हटवण्यास अजूनही विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:55 PM2019-08-24T12:55:52+5:302019-08-24T12:56:49+5:30
मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यालगतची शहरातील प्रांत कार्यालयाशेजारील झाडे काढण्यासाठी सुरुवात झाली आहे. मात्र, संपादीत जागेतील बांधकामे काढण्यास नागरिकांनी विरोध केला. पावसाळा व गणेशोत्सवानंतर बांधकामे काढावी, अशी मागणी करण्यात आली.
चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यालगतची शहरातील प्रांत कार्यालयाशेजारील झाडे काढण्यासाठी सुरुवात झाली आहे. मात्र, संपादीत जागेतील बांधकामे काढण्यास नागरिकांनी विरोध केला. पावसाळा व गणेशोत्सवानंतर बांधकामे काढावी, अशी मागणी करण्यात आली.
दोन वर्षे झाली तरी चिपळुणात चौपदरीकरण काम सुरु नाही. संपादीत केलेल्या जागा मालकांना मोबदला देण्यात आला आहे. बहादूरशेख नाका ते पाग दरम्यान ५११ कुटुंब बाधीत आहेत, तर १४५ इमारती, गाळे, संरक्षक भिंत, पत्र्यांचे शेड, टपऱ्या व अन्य बांधकामासह २२ विहिरी यात नष्ट होणार आहेत.
जमीन संपादीत झालेल्या राष्ट्रीय महामार्गाने उन्हाळ्यात बांधकामे काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने लोकानी जायचे कुठे? असे सांगून त्यास विरोध केला होता. पावसाळ्यात दोन महिने काम बंद होते. शुक्रवारी प्रांत कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोरील वृक्ष तोडण्यात आले.
दुकानेही जेसीबीने हटविण्यात येणार होती. मात्र, स्थानिक दुकानदार, व्यावसायिकांनी विरोध केला व पावसाळा संपताच बाधकामे हटविण्याची मागणी केली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मोरे, माजी नगरसेवक संजय तांबे, शिवसेनेचे कपील शिर्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते तेथे उपस्थित होते.