शेअर बाजार हा उत्पन्नाचा स्त्रोत : वृंदा वझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:27+5:302021-07-08T04:21:27+5:30

रत्नागिरी : शेअर बाजार हा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे तसेच बँकिंग क्षेत्र, सरकारी क्षेत्र याचबरोबरीने चांगले करिअर ...

The stock market is a source of income: Vrinda Vaze | शेअर बाजार हा उत्पन्नाचा स्त्रोत : वृंदा वझे

शेअर बाजार हा उत्पन्नाचा स्त्रोत : वृंदा वझे

googlenewsNext

रत्नागिरी : शेअर बाजार हा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे तसेच बँकिंग क्षेत्र, सरकारी क्षेत्र याचबरोबरीने चांगले करिअर करण्याची मोठी संधी असणारे क्षेत्र म्हणून शेअर बाजार उपयुक्त ठरू शकतो, असे प्रतिपादन मुंबई येथील शेअर बाजार विश्लेषक वृंदा वझे यांनी केले.

गोगटे महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग व अर्थशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील शेअर बाजार विश्लेषक वृंदा वझे यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शेअर बाजाराविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. ए. सरतापे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पध्दतीने एकत्रित येऊन अर्थशास्त्र विभागाच्या विकासासाठी चर्चा केली. या चर्चेमध्ये २०२१-२२ चे अध्यक्ष राजेश बिर्जे, उपाध्यक्ष श्रेया राऊत आणि प्रा. दिगंबर चौगुले, खजिनदार चारुलता खेर, सहखजिनदार प्रियांका चौगुले, सचिव शीतल धनावडे, सहसचिव प्रा. विनोद भुवड व पूनम आयरे, प्रवक्तापदी सूर्यकांत माने, पुरुष प्रतिनिधी पराग कांबळे, महिला प्रतिनिधिपदी युक्ता शिवदे यांची निवड करण्यात आली आहे. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. ए. सरतापे यांनी याबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: The stock market is a source of income: Vrinda Vaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.