तंबाखूजन्य पदार्थांचा साठा, एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:31 AM2021-03-26T04:31:38+5:302021-03-26T04:31:38+5:30
रत्नागिरी : तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधित असताना या मालाचा अनधिकृतरित्या विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी तालुक्यातील निवळी बाईतवाडी येथील एकाला अन्न व ...
रत्नागिरी : तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधित असताना या मालाचा अनधिकृतरित्या विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी तालुक्यातील निवळी बाईतवाडी येथील एकाला अन्न व औषध प्रशासनाचा पथकाने अटक केली. त्याच्याकडून २,१२५ रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई बुधवार २४ मार्च २०२१ रोजी
संध्याकाळी ४ वाजण्याचा सुमारास करण्यात आली.
महेंद्र सुरेश कारकर (रा. बाईतवाडी, निवळी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याचा दुकान रवळनाथ पान शाॅप निवळी फाटा येथे अन्न व औषध प्रशासनाचे भरारी पथकाने भेट दिली. त्यावेळी पान शाॅपमध्ये केलेल्या तपासणीत प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांमध्ये विमल असलेल्या पान मसाला, टोबॅकोची पाकिटे, विमल पान मसाला पाकिटे, तैमूर पानमसाला, टी. आर. सुगंधी तंबाखू अशी ९८ पाकिटे जप्त
करण्यात आली आहेत.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दशरथ मारुती बांबळे (५६) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. महेंद्र कारकर याच्या विरोधात अन्न सुरक्षा व मानदे कायदे कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाेलीस करत आहेत.