मृत महिलेचे दागिने चोरले, महिलेवर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:34 AM2021-08-19T04:34:53+5:302021-08-19T04:34:53+5:30
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना, मृत झालेल्या वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने चोरल्याप्रकरणी महिला कामगारावर कारवाई केली ...
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना, मृत झालेल्या वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने चोरल्याप्रकरणी महिला कामगारावर कारवाई केली जाणार आहे. सदर महिला कामगार कंत्राटी असून, तिला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.
सुलोचना गुणाजी पाटील (८६, रा.पाली, रत्नागिरी) असे या महिलेचा ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र, त्यांच्यावर अंगावरील दागिने गायब असल्याचे मृतदेह ताब्यात घेताना लक्षात आले. याबाबत त्यांची नात समीक्षा रामदास पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता.
या तक्रार अर्जानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी एक समिती नेमली व त्या समितीने सखोल चौकशी केली असता, एका कंत्राटी कामगाराने हा प्रकार केल्याचे कळते. त्या कंत्राटी कामगाराकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, चोरीसारखे गंभीर कृत्य केल्याबद्दल लवकरच कामगारावर कारवाई करण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. रुग्णाच्या नातेवाइकांकडे पोलिसांत तक्रार करण्याचा मार्ग मोकळा असल्याची भूमिकाही रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे.