पाेट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:35 AM2021-09-21T04:35:45+5:302021-09-21T04:35:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : सामान्य नागरिकांना अप्रत्यक्षरित्या कोणता ना कोणता कर भरावाच लागतो. मात्र, जास्त उत्पन्न असलेल्यांनाच किंवा ...

Stomach-filling fights; Why should I pay taxes? | पाेट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?

पाेट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : सामान्य नागरिकांना अप्रत्यक्षरित्या कोणता ना कोणता कर भरावाच लागतो. मात्र, जास्त उत्पन्न असलेल्यांनाच किंवा मोठा व्यवसाय करणाऱ्यांनाच आयकर किंवा व्यवसाय कर भरावा लागतो, असा गैरसमज सामान्य जनतेमध्ये असतो. त्यामुळे अल्प उत्पन्न मिळविणारे घटक आपल्याला कुठलाच कर भरावा लागत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत असतात.

थेट किंवा अप्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर असे कर भरण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. आयकर भरणाऱ्यांना अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा असल्याने कमी उत्पन्न असलेले काही जण यातून सुटतात. तसेच व्यवसाय कराबाबतही नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत असे वर्गीकरण असल्याने व्यवसायाची नोंदणी नसलेले उदाहरणार्थ, फेरीवाले, घरकाम करणारे आदींना हा कर भरावा लागत नाही. त्यामुळे या लोकांना आपले उत्पन्न तुटपुंजे असल्याने आपल्याला कुठलाच कर लागू नसल्याचे वाटते.

पण अर्थकारण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, आपण अगदी एक रुपयाची वस्तू जरी खरेदी केली तरी त्या किमतीत त्या उत्पादनाच्या कराचा (अबकारी कर) समावेश होतो. तसेच पाणीपट्टी, वीज बिल, घरपट्टी असे अनेक कर भरावेच लागतात.

देशाच्या प्रत्येक नागरिकाला प्रत्यक्ष दिसत नसला तरी कुठला ना कुठला तरी अप्रत्यक्ष कर भरावाच लागतो. आपण अप्रत्यक्ष कर टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही विविध रूपात तो आपण भरत असतो. पाणी बिल, वीज बिल, घरपट्टी अशी अनेक उदाहरणे आहेत. व्यवसाय कर आणि आयकर यातून आपली सुटका झाली असे सामान्य जनतेला किंवा कामगार, कष्टकरी लोकांना वाटत असले तरीही उत्पादन केलेल्या वस्तूंची खरेदी करताना त्यावरील अबकारी कर त्या वस्तूंच्या मूल्यात समाविष्ट असतो. अनेक वस्तूंच्या किमतीत जीएसटी कराचा समावेश असतो.

प्रा. उदय बोडस, अर्थशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक, रत्नागिरी

.....

आपण भरता का टॅक्स?

- कामगार : आधीच पगार कमी मग टॅक्स कसला भरणार

- ऑटो चालक : व्यवसाय कर त्याचबरोबर वाहन कर आदी कर भरावेच लागतात

- भाजीवाला विक्रेता : व्यवसाय कराबरोबरच पाणी, जागेचा असे अनेक कर भरावेच लागतात.

- फेरीवाला : माझं उत्पन्न तुटपुंजे मग कर कशासाठी भरणार

- सिक्युरिटी गार्ड : व्यवसाय कर कापूनच पगार दिला जातो.

- सफाई कामगार : पगारातून भागतानाच मारामार, कर कशासाठी भरायचा

- सलून चालक : आधीच कोरोनाने त्रस्त केले. तरीही अनेक कर माथी आहेतच.

- लाॅंड्री चालक : व्यवसायातून उत्पन्नच कमी येते, कर कसला देऊ?

- घरकाम करणारी महिला : घरकाम करते, त्यातून कुटुंबाचा खर्च भागताना नाकी नऊ, कर कशाला भरू?

- हमाल : आमचे हातावरचे पोट, कर कशासाठी द्यायचा?

- हातगाडी : आमचेच उत्पन्न बेभरवशांचे, कर कशावर देणार?

- फर्निचर कारागीर : उत्पन्नातून जेमतेम भागते. त्यामुळे कर नाहीच.

Web Title: Stomach-filling fights; Why should I pay taxes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.