गोवंशीय हत्येप्रकरणी मोर्चा अन् रास्ता रोको: नीलेश राणेंसह ४५० जणांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 01:38 PM2024-07-10T13:38:10+5:302024-07-10T13:38:34+5:30

रत्नागिरी : गोवंशीय हत्येप्रकरणी हिंदू संघटनांतर्फे काढण्यात आलेला मोर्चा आणि रास्ता रोकोप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह ४५० जणांविरोधात ...

Stop march and road in cow slaughter case: Case registered against 450 people including Nilesh Rane  | गोवंशीय हत्येप्रकरणी मोर्चा अन् रास्ता रोको: नीलेश राणेंसह ४५० जणांवर गुन्हा दाखल 

गोवंशीय हत्येप्रकरणी मोर्चा अन् रास्ता रोको: नीलेश राणेंसह ४५० जणांवर गुन्हा दाखल 

रत्नागिरी : गोवंशीय हत्येप्रकरणी हिंदू संघटनांतर्फे काढण्यात आलेला मोर्चा आणि रास्ता रोकोप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह ४५० जणांविरोधात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजाेळे येथील रस्त्यावर गाेवंशीय शिर सापडले हाेते. याप्रकरणी संबंधितावर कारवाई हाेण्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे रविवारी माेर्चा काढण्यात आला हाेता. माेर्चादरम्यान संबंधिताला अटक हाेण्यासाठी जेलनाका परिसरात ठिय्या मांडला हाेता. याप्रकरणी पाेलिसांनी आंदाेलनकर्त्यांवर कारवाई केली आहे.

यामध्ये चंद्रकांत राऊळ, नीलेश राणे, बाळ माने, राकेश नलावडे, नंदकुमार चव्हाण, राज परमार, स्वरूप पाटील, दत्तात्रय जोशी, पराग तोडणकर, अक्षय चाळके, स्वयंम नायर, संतोष पवार, देवांग, समर्थ पाटील, फाळके, कुलकर्णी यांच्यासह ४५० जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी मिळून रविवारी सकाळी ११:३० ते दुपारी २:३५ या कालावधीत मारुती मंदिर शिवसृष्टी, माळनाका ते जेलरोड असा मोर्चा काढत रास्ता रोको केला होता. त्यांनी शासनाने ४ जुलै ते ३० जुलै २०२४ या कालावधीसाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३१ (१) अन्वये जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Stop march and road in cow slaughter case: Case registered against 450 people including Nilesh Rane 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.