पिंपळीत शिवसेनेचे रास्ता रोको, पोलिसांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:28 PM2019-02-26T12:28:02+5:302019-02-26T12:29:54+5:30
हागर - विजापूर महामार्ग रुंदीकरणाच्या कामात दिरंगाई व निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात तसेच दुचाकी, चारचाकी वाहनचालक व प्रवाशांच्या होणाऱ्या त्रासाबाबत महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांना जाब विचारण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी सोमवारी पिंपळी येथे रास्ता रोको करुन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना निवेदन दिले.
चिपळूण : गुहागर - विजापूर महामार्ग रुंदीकरणाच्या कामात दिरंगाई व निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात तसेच दुचाकी, चारचाकी वाहनचालक व प्रवाशांच्या होणाऱ्या त्रासाबाबत महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांना जाब विचारण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी सोमवारी पिंपळी येथे रास्ता रोको करुन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना निवेदन दिले.
चिपळूण तालुक्यातील गुहागर - विजापूर मार्गावरील खेर्डी ते पिंपळी मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत निकृष्ट व कामात दिरंगाई होत आहे. यावेळी ठेकेदाराला घेराओ घालण्यात आला.
प्रांत अधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अभियंता, शिरगाव व चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, ठेकेदार यांच्यासमवेत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संंयुक्त बैठक आयोजित करुन ठोस उपाययोजना होत नाही, तोपर्यंत महामार्गाच्या कोणत्याही कामाला ठेकेदाराने हात लावायचा नाही, असा दम तालुकाप्रमुख शिंदे यांनी दिला.
यावेळी शिवसेनेचे तालुका समन्वयक राजू देवळेकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख सुप्रिया सुर्वे, युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते, शिवसेना युवानेते मयुर खेतले, चंद्रकांत राणे, गंगाराम पवार, प्रकाश सुर्वे आदी उपस्थित होते.
गुन्हा दाखल करावा
कामाचे साहित्य वाटेत टाकले जात असल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. धूळ व मातीमुळे वाहतूक व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार व महामार्गाचे संबंधित अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.