नेपाळी रखवालदारांबाबत कडक पावले, कामावर ठेवणाऱ्या मालकाने पोलिस ठाण्यात नोंदणी न केल्यास गुन्हा दाखल होणार 

By शोभना कांबळे | Published: May 16, 2024 07:08 PM2024-05-16T19:08:49+5:302024-05-16T19:09:00+5:30

रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागायतींच्या रखवालीसाठी तसेच मच्छिमारी नाैकेवर खलाशी म्हणून सुमारे १५,००० ते २०,००० इतके नेपाळी जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. मात्र, पोलिसांकडे केवळ ४२०० जणांचीच नोंदणी झालेली आहे. आंबा बागायतींमध्ये असणारे रखवालदार आंबा हंगाम संपला की परत त्यांच्या मूळ गावी जातात.

Strict action on Nepalese janitors, case will be registered if the employer does not register with the police station | नेपाळी रखवालदारांबाबत कडक पावले, कामावर ठेवणाऱ्या मालकाने पोलिस ठाण्यात नोंदणी न केल्यास गुन्हा दाखल होणार 

नेपाळी रखवालदारांबाबत कडक पावले, कामावर ठेवणाऱ्या मालकाने पोलिस ठाण्यात नोंदणी न केल्यास गुन्हा दाखल होणार 

रत्नागिरी : तालुक्यातील पावस नजीकच्या गोळप येथील नेपाळ्यांच्या दुहेरी हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी नेपाळी रखवालदारांबाबत कडक पावले उचलली आहेत. या गुरख्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांनी त्यांची नोंदणी संबंधित पोलिस ठाण्यात न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. त्यामुळे आता या गुरख्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांनाही जातीने या गुरख्यांची नोंदणी करावी लागणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागायतींच्या रखवालीसाठी तसेच मच्छिमारी नाैकेवर खलाशी म्हणून सुमारे १५,००० ते २०,००० इतके नेपाळी जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. मात्र, पोलिसांकडे केवळ ४२०० जणांचीच नोंदणी झालेली आहे. आंबा बागायतींमध्ये असणारे रखवालदार आंबा हंगाम संपला की परत त्यांच्या मूळ गावी जातात. या नेपाळी व्यक्तींकडे त्यांच्या देशाचे आधारकार्ड असते. देशात किंवा कोकणात कामाला ठेवल्यानंतर त्यांची माहिती मालकाने पोलिस ठाण्यात सादर करणे यापुर्वीही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या नेपाळ्यांना रखवालदार म्हणून चार - पाच महिने कामावर ठेवून घेतले जाते. हंगाम संपला की त्यांना कामावरून कमी केले जाते. त्यामुळे बरेचदा ते आपल्या गावाला परत जातात.

गेल्या वीस वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात अशा नेपाळी रखवालदारांकडून गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. परप्रांतीय खलाशी, बागेतील कामगार यांच्यामध्ये वाद होतात, खून होतात. तपास करताना लक्षात येते की पोलिसांकडे अशा अनेक कामगारांची नोंद नाही. त्यामुळे अशा गुन्ह्यांच्या तपासात अनेक अडचणी येतात. बरेचदा असे रखवालदार गुन्हे करून त्यांच्या गावाला गेल्यानंतर त्या घटनेचा तपास होऊ शकत नाही. बरेचदा एका नेपाळ्याकडून दुसऱ्या नेपाळ्याला कामाला ठेवले जाते. आंबा बागायती या एका बाजुला असल्याने नेपाळी रखवालदारांमध्ये आपापसात हाणामारी होऊन खूनाचे प्रकार घडतात. मात्र, काही वेळा त्यांच्या मालकांनाच त्याच्या रखवालदाराबाबत माहिती नसल्याने पोलिसांसमोर अडचणी येतात.

रत्नागिरीत असे प्रकार वाढल्याने जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी याप्रकरणी कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात आंबा, मासेमारीसाठी येणाऱ्या नेपाळी व्यक्तींची त्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांनी  पोलीस स्थानकात नोंदणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी न करणाऱ्या आंबा बागायतदार, नौका मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

नेपाळी लोकांकडे त्यांच्या देशाने दिलेले आधारकार्ड असते. रत्नागिरी जिल्ह्यात कामाला असलेल्या नेपाळी लाेकांकडून अनेक गुन्हे घडले आहेत. मात्र, त्याची माहिती पोलिस ठाण्यात दिलेली नसल्याने अनेकदा तपास होऊ शकत नाही. त्यामुळे हे वाढते गुन्हे लक्षात घेऊन त्याच्यावर आळा बसण्यासाठी त्यांच्या मालकांनी कामावर ठेवताना त्यांची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात द्यावी. न दिल्यास मालकांवरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
- धनंजय कुलकर्णी. जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी
 

Web Title: Strict action on Nepalese janitors, case will be registered if the employer does not register with the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस