वाकवलीत शिक्षकाला मारहाण करून लुटले

By admin | Published: October 26, 2016 12:10 AM2016-10-26T00:10:37+5:302016-10-26T00:10:37+5:30

कऱ्हाडच्या तिघा व्यापाऱ्यांना अटक

Striking a teacher in a knockdown | वाकवलीत शिक्षकाला मारहाण करून लुटले

वाकवलीत शिक्षकाला मारहाण करून लुटले

Next

दापोली : गाडीला धक्का मारून पुढे गेल्याने शिक्षकाला मारहाण करून त्याची दुचाकी, मोबाईलसह एटीएम कार्ड घेऊन पलायन करणाऱ्या बाप-लेकासह तिघांना दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. ही घटना दापोली तालुक्यातील वाकवली येथे घडली.
मोहनलाल चांडक (वय ५८), सूरज मोहनलाल चांडक (२९), शरद प्रमेशवर पिसाळ (२९, कराड, सोमवार पेठ, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, ते किराणा मालाचे व्यापारी आहेत. त्यांची चारचाकी गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
सविस्तर वृत्त असे, सागर श्रीधर दोड हे पोफळणे शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. ते खेड तालुक्यातील भरणे येथील रहिवासी आहेत. ते सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाले. वाकवलीजवळ येथे एका चारचाकी गाडीतील तीन प्रवाशांनी त्यांना थांबवले. तू आमच्या गाडीला धक्का मारून पुढे आला आहेस, असा आरोप करून त्या गाडीतील प्रवाशांनी दोड यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, इतके पैसे कशासाठी असे दोड यांनी विचारल्यानंतर त्या तिघांनी दोड यांना अचानक मारहाण करायला सुरुवात केली. त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. त्यामुळे घाबरलेले दोड एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. एटीएममध्ये पैसे काढण्याला मर्यादा असल्याने दोड त्या गाडीतील प्रवाशांना ५० हजार रुपये देऊ शकले नाहीत. त्यामुळे या तिघांनी दोड यांना शिवीगाळ करून एटीएम, मोबाईल व त्यांची मोटारसायकल घेऊन खेडच्या दिशेने पलायन केले.
काही वेळातच दोड यांनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. दुचाकी, एटीएम, मोबाईल घेऊन पळालेले लोक उन्हवरे मार्गे गेल्याची खबर दापोली पोलिसांना लागली. त्यानुसार पोलिसांनी माग काढण्यास सुरुवात केली. एमएच-५०/ए-६७५४ ही गाडी घेऊन ते तिघे उन्हवरे मार्गे जात होते. दापोलीचे पोलिस निरीक्षक डॅनियल बेन, भालचंद्र धारवलकर यांनी पाठलाग करून ही गाडी पकडली.
गाडीतील हे तिन्ही प्रवासी सातारा येथील व्यापारी असल्याची आणि त्यांची नावे मोहनलाल चांडक, सूरज मोहनलाल चांडक आणि शरद प्रमेशवर पिसाळ असल्याची माहिती पोलिस चौकशीत पुढे आली.
या तिघांकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एवढा प्रकार होईपर्यंत ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे असंख्य शिक्षकांनी पोलिस स्थानकात गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
 

Web Title: Striking a teacher in a knockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.