गड संवर्धनासाठी प्रयत्नशील राहणार : सुहास राजेशिर्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:38 AM2021-09-04T04:38:10+5:302021-09-04T04:38:10+5:30
अडरे : गडकिल्ल्यांची संवर्धन मोहीम ठिकठिकाणी सध्या सुरू आहे. रायगडाच्या संवर्धनासाठी स्थानिकांनी सर्वेक्षण करून गरजेची कामे सुचवावीत. ती पूर्ण ...
अडरे : गडकिल्ल्यांची संवर्धन मोहीम ठिकठिकाणी सध्या सुरू आहे. रायगडाच्या संवर्धनासाठी स्थानिकांनी सर्वेक्षण करून गरजेची कामे सुचवावीत. ती पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन साताऱ्याचे विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी दिले.
अतिवृष्टीमुळे रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या आई शिरकाई मंदिराच्या मागील भिंत कोसळली होती. रायगडाची गडदेवता शिरकाई देवीचे गडावर एक आणि पायथ्याशी एक मंदिर आहे. राजेशिर्के घराण्याची ही कुलदेवता असल्याने पायथ्याच्या मंदिराचे नूतनीकरण करण्यासाठी सुहास राजेशिर्के यांनी पुढाकार घेतला होता. परिसरातील वाड्या-वस्त्यांमधील ग्रामस्थांनी श्रमदानातून नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास नेले, त्याला २ सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलताना राजेशिर्के यांनी गडाच्या परिसरातील धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याची सूचना ग्रामस्थांना केली. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सात वाड्यांमधील ग्रामस्थ उपस्थित होते. सुहास राजेशिर्के यांनी मंदिराच्या नूतनीकरणासाठी हातभार लावल्याबद्दल शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले.
छत्री निजामपूरच्या विद्यमान सरपंच प्रेरणा सावंत यांनीही समाधान व्यक्त केले. रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अनेक पुरातन मंदिरांच्या नूतनीकरणासंबंधी काहीही काम असेल रायगड गाईड संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संघटनेने मंदिरासाठी गेले दोन महिने दिवस-रात्र एक केल्याने कामे वेळेत पूर्ण झाली, याबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.