प्रकल्पाचे ठाम समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:21 AM2021-06-29T04:21:28+5:302021-06-29T04:21:28+5:30

- सुहास पाटील, माजी सरपंच, सोलगाव ---------------------------------- प्रकल्पांतर्गत बाधित गावातील सर्व ग्रामस्थांना तालुक्यापर्यंतचा पक्का रस्ता, मोफत परिवहन व्यवस्था, अव्याहत ...

Strong support for the project | प्रकल्पाचे ठाम समर्थन

प्रकल्पाचे ठाम समर्थन

Next

- सुहास पाटील, माजी सरपंच, सोलगाव

----------------------------------

प्रकल्पांतर्गत बाधित गावातील सर्व ग्रामस्थांना तालुक्यापर्यंतचा पक्का रस्ता, मोफत परिवहन व्यवस्था, अव्याहत वीजपुरवठा, सर्व घरांना नळपाणी योजना, गावच्या शैक्षणिक संस्थांचे पुनर्नवीकरण व सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिपूर्ण वैद्यकीय सुविधा ज्यात एमबीबीएस डॉक्टर्ससह सर्व पीएचसींचे नूतनीकरण व आवश्यक साधनसामुग्रीचा पुरवठा, शिवाय बचत गटांना सहाय्य आणि रोजगार इत्यादी अपेक्षित आहे. प्रकल्प न आल्यास यातील कोणतीही सुविधा ग्रामस्थांना मिळणार नाही. ती एनजीओ अथवा प्रकल्पाचे बेगडी विरोधक पुरवणार आहेत का?

- विनायक कदम, बारसू ग्रामस्थ

-------------------------

पर्यावरणवाद्यांनी नाणार पंचक्रोशीत महिलांना घरगुती उद्योग निर्मिती करून देऊ, याकरिता मेळावे घेतले होते व पतपुरवठा करण्याची वचने दिली होती. त्यापैकी गेल्या चार वर्षांत किती महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला व किती पतपुरवठा केला, याचा तपशील जाहीर करा. पर्यावरण रक्षणाचे ढोल वाजविणाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत कोकणात किती झाडे लावली व कोठे याबद्दल माहिती द्यावी.

- सुरज पेडणेकर, भाजप पदाधिकारी, धाेपेश्वर

------------------------------

कोविडच्या या कठीण काळात रिफायनरीने भारतभर कोविड केअर सेंटरची निर्मिती केली. रूग्णांना थेट ऑक्सिजनचा पुरवठा केला. राजापूर तालुक्यात चोवीस तास मोफत रूग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली. यापैकी एनजीओंनी कोणते कार्य कधी, कोठे व कसे केले, याची माहिती राजापूर तालुक्याला द्यावी. केवळ आपल्या स्वार्थासाठी प्रकल्प होऊ घातलेल्या भागात पोहोचणाऱ्या एनजीओंनी आपल्या उदरनिर्वाहाची साधने जाहीर करावीत व कोकणात येऊन राहावे.

- डॉ. सुनील राणे, नाटे

---------------------------

सोलगावच्या कातळावर रिफायनरी प्रकल्प आल्यास या प्रकल्पामुळे एक ते दीड लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. त्यापैकी आमच्या ग्रामस्थांना प्राधान्याने प्रशिक्षण व नोकरी व्यवसायाची तरतूद या प्रकल्पाद्वारे होऊ घातली आहे. बाधित गावांसोबत असा करार करण्यास कंपनी तयार आहे. प्रकल्प रद्द झाल्यास अशाप्रकारची कोणती तरतूद प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांकडे आहे, याची माहिती तालुकावासीयांना द्यावी.

- मनोहर गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष, बारसू़

-----------------------------------

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभ्यासाअंती रिफायनरी प्रकल्पाला आपले जाहीर समर्थन दिलेले आहे. राज ठाकरे यांचा महाराष्ट्राचा दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणचा विकास करण्याची क्षमता या प्रकल्पामुळे असल्याचे त्यांनी ताडले आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच असणार, याची खात्री आम्हाला आहेच. त्यामुळे आमच्या भागात प्रकल्प येण्यासाठी आम्ही कायमच पुढे राहू.

- राजाराम खांबल, मनसे उपतालुकाध्यक्ष, राजापूर

----------------------------------

इतर शहरे आणि गावे पाहता व राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विचार करता, या तालुक्याच्या सर्वांगिण विकासाला आणखी पन्नास वर्षे लागू शकतात. मात्र, हाच विकास एखाद्या प्रकल्पामुळे नजिकच्या काळात होणारा असेल तर ही संधी नाकारणे म्हणजे कपाळकरंटेपणा ठरेल. रोजगार, व्यवसायाच्या संधी आणि शैक्षणिक व आरोग्याच्या परिपूर्ण सुविधा विकासाच्या संकल्पना यापेक्षा वेगळ्या काय असणार, तेव्हा आम्ही आमच्या भागात येऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले नाही तर तो भावी पिढी आणि तालुक्यावरचा अन्याय ठरेल.

- सुभाष श्रुंगारे, राजवाडी

Web Title: Strong support for the project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.