जीवनदायी सहीत अडकली

By admin | Published: July 13, 2014 12:18 AM2014-07-13T00:18:06+5:302014-07-13T00:22:22+5:30

पुरवठा विभाग : १४ हजार ९४३ कार्डबाबत प्रश्न कायम

Stuck with the life span | जीवनदायी सहीत अडकली

जीवनदायी सहीत अडकली

Next

संकेत गोयथळे ल्ल गुहागर
राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत तालु्क्यात या योजनेचा लाभ घेण्यास २८ हजार १०९ लाभार्थी पात्र ठरले आहेत. मात्र तालुक्यासाठी आरोग्य विभागाकडे आलेल्या ३९ हजार ५०० कार्डांपैकी तब्बल १८ हजार कार्ड न्यायालयीन वादात अडकली आहेत. लाभार्थ्यांची नावे प्रिंट होऊन आलेल्या १४ हजार १५३ वाटप झालेल्या कार्डस्वर अधिकारी सही करत नसल्याने बहुतांशी लाभार्थी योजनेपासून वंचित राहिले आहेत.
पुरवठा विभागाकडून योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी शिधापत्रिकेनुसार निश्चित करण्यात आली. पुरवठा विभागाकडे असणारा कामाचा बोजा लक्षात घेऊन तालुक्यातील महा ई सेवा केंद्रंना अधिकृत नोंदीनुसार दिलेली कोरी कार्ड लाभार्थ्यांची नावे छपाई करणेसाठी देण्यात आली. प्राप्त झालेल्या ३९ हजार ५०० कोऱ्या कार्डपैकी शृंगारतळी येथील महा ई सेवा केंद्रचालक प्रकाश रांजाणे यांना १७ हजार ५०० कार्ड आरोग्य विभाग गुहागर यांच्याकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील पहिले महा ई सेवा केंद्र असलेल्या शृंगारतळी केंद्रचालक चंद्रकांत काष्टे यांच्याकडून या योजनेची कार्ड परस्पर वाटप करुन यासाठी ५० ते १०० रु. आकारले जात असल्याची तक्रार झाल्यानंतर चंद्रकांत काष्टे यांना अटक हाऊन महा ई सेवा केंद्रातील सर्व कार्ड न्यायालयात जमा करण्यात आली आहेत. १७ जुलैला याबाबत सुनावणी होणार असून कार्ड मिळतील असे सांगण्यात आले.
अडूर महा ई सेवा केंद्राला देण्यात आलेल्या १७ हजार ५०० कार्डपैकी १४ हजार १५३ कार्ड छपाई होऊन आरोग्य विभागाकडून आली. आरोग्य सेवकांमार्फत बहुतांशी कार्ड वाटप करण्यात आली आहेत. वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, पोस्टमास्तर, सहाय्यक पोस्टमास्तर, मंडळ निरीक्षक, मंडळ अधिकारी व अन्य राजपत्रित अधिकारी तसेच शहरी वैद्यकीय अधीक्षक व सहाय्यक अधीक्षक, पोस्टमास्तर व सहाय्यक पोस्टमास्तर यापैकी कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्यांची या कार्डवर लाभार्थ्याने फोटो लावून सही घेतल्यानंतर ही कार्डस् अधिकृत होणार आहेत.

Web Title: Stuck with the life span

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.