विद्यार्थ्यांनीच बुजवला खड्डा

By admin | Published: November 18, 2014 09:38 PM2014-11-18T21:38:33+5:302014-11-18T23:21:31+5:30

ग्रामस्थांसमोर आदर्श : कोकरेतील रस्त्याचा प्रश्न मिटला

The students did not feel bad about the pit | विद्यार्थ्यांनीच बुजवला खड्डा

विद्यार्थ्यांनीच बुजवला खड्डा

Next

असुर्डे : कोकरे - नायशी रस्त्यादरम्यान घाणेकरवाडी येथे मोठा खड्डा पडल्यामुळे अनेक वाहनचालकांना वाहन चालविणे धोक्याचे बनले होते. कोकरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी समाजसेवचा एक भाग म्हणून हा खड्डा बुजवण्याचे काम हाती घेतले. दगड आणि मातीच्या सहाय्याने खड्डा बुजवण्यात आला़
या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे एक्सेल तुटले होते. काही वाहनांचे टायर पंक्चर झाले होते. याबाबतची चर्चा सर्वत्र असल्याने विद्यार्थ्यांनी स्वत: पुढाकार घेऊन हा खड्डा बुजवला. त्यासाठी त्यांनी मार्गदर्शक म्हणून एस. बी. ढेकळे यांंची मदत घेतली़ हाच धडा अन्य ग्रामस्थांनी घेतला, तर सार्वजनिक कामे चुटकीसरशी होऊ शकतात, हा संदेशच या विद्यार्थ्यांनी दिला.
केवळ शासनावर अवलंबून न राहता आपणदेखील सर्व समस्या सोडवू शकतो, हे दाखवून दिले आहे. विद्यार्थ्यांच्या या कामामुळे अनेक वाहनचालकांनी त्यांना धन्यवाद दिले़
मैलकुलींना शासनाने कायमचे घरी बसवल्यामुळे असे खड्डे बुजविणे, रस्त्यालगतची झाडेझुडपे तोडणे ही कामे होत नसल्याने अनेक अपघात होत आहेत. तसेच अनेक वाहनांचे खड्ड्यांमुळे नुकसान होत आहे़ यावर शासनाने कायमचा उपाय योजून ठोस योजना हाती घ्यावी, असे म्हटले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: The students did not feel bad about the pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.