विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणाची गरज : संजय शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:47+5:302021-07-14T04:36:47+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : नैसर्गिक संपदेचा वारसा लाभलेल्या चिवेली गावात पर्यावरणाला सुद्धा एक नवीन संधी आहे. त्यामुळे ...

Students need skills based education: Sanjay Shirke | विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणाची गरज : संजय शिर्के

विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणाची गरज : संजय शिर्के

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : नैसर्गिक संपदेचा वारसा लाभलेल्या चिवेली गावात पर्यावरणाला सुद्धा एक नवीन संधी आहे. त्यामुळे येथील शिक्षण संस्थेने शिक्षणाबरोबरच स्वावलंबी बनवण्याकडे लक्ष द्यावे. यासाठी कौशल्य आधारीत शिक्षण दिले, तर विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग लवकर सापडेल, अशा सल्ला रिगल कॉलेजचे संस्थापक संजय शिर्के यांनी चिवेली पंचक्रोशी विकास संस्थेच्या आयोजित सभेत दिला.

चिवेली आदर्श विद्यामंदिर येथे संस्थेने शैक्षणिक मार्गदर्शनपर संस्था आणि स्कूल कमिटीची सभा आयोजित केली होती. या सभेत संजय शिर्के बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश शिर्के, सल्लागार रघुनाथ शिर्के, संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र वणे, कार्यवाह मंगेश शिर्के, अंबरनाथ येथील नगरसेवक राजेश शिर्के, स्कूल कमिटी चेअरमन यशवंत शिर्के आणि मुख्याध्यापक संजय चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमात पुढे संजय शिर्के म्हणाले की, छोटे-छोटे कोर्सेस सुरू केले तर नंतर उत्तम प्रतिसाद मिळू शकेल, हे आपण स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहोत. मात्र, यासाठी शिक्षक व पालक यांची जबाबदारी मोठी आहे. मुलांमधील सुप्त गुण ओळखून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक संजय चव्हाण यांची चिपळूण तालुका मुख्याध्यापक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले तर स्कूल कमिटीचे व्हाईसचेअरमन संतोष कुळे याना रत्नसिंधू संस्थेचा राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार मिळल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

-------------------------------------

चिपळूण तालुक्यातील चिवेली येथील सभेत रिगल काॅलेजचे संस्थापक संजय शिर्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेने अध्यक्ष रमेश शिर्के, रघुनाथ शिर्के, नरेंद्र वणे, मंगेश शिर्के, राजेश शिर्के, यशवंत शिर्के, संजय चव्हाण उपस्थित होते.

130721\img-20210713-wa0015.jpg

विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणाची गरज - संजय शिर्के

Web Title: Students need skills based education: Sanjay Shirke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.