Ratnagiri News: पहिल्याच दिवशी भर पावसात विद्यार्थी शाळेबाहेर, रायपाटण गावातील दुर्दशा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 04:22 PM2022-06-15T16:22:54+5:302022-06-15T16:24:32+5:30

राज्यातील अनेक शाळांमध्ये फुलं आणि फुग्यांच्या सजावटीने तसंच लेझीम, ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. परंतु रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील रायपाटण गावातील दुर्दशा समोर आली आहे.

Students out of school in heavy rain on first day, Raipatan village in Rajapur taluka | Ratnagiri News: पहिल्याच दिवशी भर पावसात विद्यार्थी शाळेबाहेर, रायपाटण गावातील दुर्दशा

Ratnagiri News: पहिल्याच दिवशी भर पावसात विद्यार्थी शाळेबाहेर, रायपाटण गावातील दुर्दशा

googlenewsNext

राजापूर : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. राज्यातील अनेक शाळांमध्ये फुलं आणि फुग्यांच्या सजावटीने तसंच लेझीम, ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. परंतु रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील रायपाटण गावातील विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस फारसा चांगला नव्हता. शाळेच्या पहिल्याच दिवशी जमीन मालकाने विद्यार्थ्यांचा मार्ग अडवून धरला. शाळेच्या जमिनीवर जमीन मालकाने दावा केल्याने विद्यार्थ्यांना भरपावसात शाळेबाहेरचं उभे राहावं लागलं.

बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. प्रवेशद्वार फुगे, फुलांनी सजवलले होते. लेझीम, ढोलताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना वही पेन देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह दिसून येत होता. या चिमुकल्यांचे रडणे, शिक्षकांचं समजावणं, मुलांचा किलबिलाट यामुळे शाळा दोन वर्षांनंतर गजबजून गेल्याचं दिसून आलं. मात्र, रायपाटण येथे मुलांना शाळेतच जाता आले नाही.

राजापूर तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या रायपाटण गावात हा प्रकार घडला आहे. जिल्हा परिषदेची शाळा माझ्या जागेत आहे. मी कुणाला जाऊ देणार नाही, असं म्हणत संबंधित जमीन मालकाने कुंपण देखील घातलं आहे. शाळेच्या जमिनीवर जमीन मालकाने दावा केल्याने विदयार्थी भर पावसात शाळेबाहेर उभं राहावं लागलं आहे.

शाळेच्या नूतनीकरणाबाबत याच मालकाने आडकाठी केल्याने २०१९ पासून हे प्रकरण दिवाणी न्यायालयात गेलं आहे. पण असं असलं तरी शाळेच्या इमारतीचा सात बारा जिल्हा परिषदेच्या नावावर आहे, अशी माहिती तंटामुक्ती अध्यक्षाने दिली आहे. या सगळ्या गोंधळात गटशिक्षण आणि इतर अधिकारी गावात दाखल झाले आहेत.

Web Title: Students out of school in heavy rain on first day, Raipatan village in Rajapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.