जन आंदोलनाच्या संघर्ष समितीचा अभ्यास दौरा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:01+5:302021-08-18T04:37:01+5:30
चिपळूण : अतिवृष्टी व महापुरामुळे तालुक्यात झालेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तिंचा अभ्यास दौरा सोमवारपासून सुरू झाला आहे. जन ...
चिपळूण : अतिवृष्टी व महापुरामुळे तालुक्यात झालेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तिंचा अभ्यास दौरा सोमवारपासून सुरू झाला आहे. जन आंदोलनाच्या संघर्ष समितीने या दौऱ्याचे आयोजन केले आहे.
या अभ्यासकांनी तिवरे गंगेची वाडी, गावठाण, राधानगरी, नांदिवसे, आकले आदी गावातील डोंगरांमध्ये झालेले भूस्खलन, दरडीला पडलेल्या भेगा, नद्या, नाल्यांचे प्रवाह यांची पाहणी केली. या अभ्यास दौऱ्यात वालमी, औरंगाबादचे निवृत्त प्राध्यापक तसेच नामवंत पर्यावरणतज्ज्ञ, लेखक डॉ. प्रदीप पुरंदरे, चिपळूणच्या डी. बी. जे. महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. बी. राजे, प्रा. राहुल पवार, प्रा. राम साळवी, गुहागरच्या खरे - ढेरे महाविद्यालयाचे डॉ. गोळेकर, चिपळूणचे सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर तसेच जन संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
सोमवारी दुपारनंतर चिपळूण शहरातील बहादूर शेख पूल, वांगडे मोहल्ला, मुरादपूर, शंकरवाडी, बाजारपूल, पेठमाप, गोवळकोट, उक्ताड, खेंड, पागमळा व शिव नदी परिसराची या पथकाने पाहणी केली. या अभ्यास गटात भूस्तरतज्ज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी हेही सहभागी झाले होते.