विषय समित्यांचा ‘खेळ’ खल्लास!

By admin | Published: January 4, 2017 10:53 PM2017-01-04T22:53:04+5:302017-01-04T22:53:04+5:30

ठराव चिठ्ठीवर मंजूर : राजापूर नगरपरिषदेत केवळ स्थायी समिती राहणार

Subject committee's game 'Khaledas'! | विषय समित्यांचा ‘खेळ’ खल्लास!

विषय समित्यांचा ‘खेळ’ खल्लास!

Next

राजापूर : नगर परिषदेत समसमान मते पडल्याने थेट चिठ्ठीद्वारे घेतलेला कौल सत्ताधारी आघाडीच्या बाजूने पडला आणि नगर परिषदेत स्थायी समिती वगळता उर्वरित विषय समित्या निवडण्याचा निर्णय फेटाळण्यात आला. त्यामुळे राजापूर नगरपरिषद विषय समित्यांविना दिसणार आहे. नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने हनिफ काझी यांची या पदावर निवड झाली आहे.
राजापूर नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांसाठी बुधवारी बैठक घेण्यात आली. पालिकेत शिवसेनेचे आठ व एक भाजप असे नऊ एवढे संख्याबळ असून, त्याचवेळी नगराध्यक्ष हनिफ काझी व काँग्रेसचे सात नगरसेवक असे एकूण आठ व एक राष्ट्रवादीचा सदस्य धरुन एकत्रित होणारे संख्याबळ नऊ असे समसमान होते. त्यामुळे कुणाला कोणती समिती मिळणार? याचीच उत्सुकता होती.
बुधवारी सकाळी सभा सुरू होताच उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे गटनेते अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी केवळ स्थायी समिती वगळता बाकीच्या समित्या रद्द कराव्यात, असा ठराव मांडला. तो ठराव रद्द केला जावा व स्थायीसह सर्व समित्यांची निवड केली जावी, अशी उपसूचना सेनेचे गटनेते विनय गुरव यांनी मांडली.
त्यावर सायंकाळी तो ठराव मतदानाला टाकण्यात आला; मात्र दोन्ही बाजूने झालेले मतदान समसमान पडले. त्यामुळे चिठ्ठीचा प्रयोग करण्यात आला व चिठ्ठीत नशिबाने सत्ताधारी काँग्रेसला साथ दिली.
जमीर खलिफे यांचा ठराव मंजूर
झाला व त्यानंतर स्थायी समितीची
स्थापना करण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष नगराध्यक्ष हनिफ काझी
असतील, तर सदस्यांमध्ये संजय ओगले, स्नेहा कुवेस्कर, प्रतीक्षा खडपे,
गोविंद बाकाळकर व शुभांगी सोलगावकर यांचा समावेश आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यासह आता
समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी
आघाडीने विजय मिळविला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Subject committee's game 'Khaledas'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.