‘बालगंधर्व’च्या ‘अनोळखी’चे यश
By Admin | Published: December 30, 2014 09:49 PM2014-12-30T21:49:44+5:302014-12-30T23:23:54+5:30
स्पर्धा खूप चुरशीची झाली. बालगंधर्व थिएटर्स हा नवोदित संघापैकी एक संघ होता.
रत्नागिरी : अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवमधील शामराव करंडक एकांकिका स्पर्धा पार पडल्या. ‘शब्द एक अविष्कार अनेक’ अशी संकल्पना असणाऱ्या या स्पर्धेला यावर्षी ‘धर्म’ हा विषय होता. या एकांकिका स्पर्धेत बालगंधर्व थिएटर्सच्या अनोळखी एकांकिकेने उत्तम यश मिळवले.यावर्षी स्पर्धेमध्ये ६ संघ होते. स्पर्धा खूप चुरशीची झाली. बालगंधर्व थिएटर्स हा नवोदित संघापैकी एक संघ होता. या स्पर्धेत बालगंधर्व थिएटर्स, रत्नागिरी या संघाला पुढीलप्रमाणे यश प्राप्त झाले.
सर्वोत्कृष्ट एकांकिका (तृतीय) अनोळखी, बालगंधर्व थिएटर्स, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (द्वितीय) हृषिकेश लांजेकर, सर्वोत्कृष्ट लेखक (द्वितीय) राज कांबळे, सायली राऊत. सर्वोत्कृ ष्ट अभिनेता (प्रथम) साहील सावंत, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (द्वितीय) गौरी परकर. अशाप्रकारे या संघाने यश सपादन केले. या संघाला प्रा. शिंगार्डे, प्रा. वाघधरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच एकांकिका दिग्दर्शनाला सहाय्य म्हणून साई शिर्सेकर यांनी, तर प्रकाशयोजना व पार्श्वसंगीतासाठी शुभम पांचाळ व विवेक उंबरकर, नेपथ्यासाठी प्रशांत पवार यांनी काम पाहिले. या एकांकिकेत स्नेहा चव्हाण, हृषिकेश लांजेकर, साहील सावंत, गौरी परकर, ट्विंकल महाडिक, संकेत पवार, मयूर काखंडकी, भक्ती घाडी, राज कांबळे यांनी सहभाग घेतला. तसेच संपूर्ण कॉलेजला आपली नवी ओळख करुन देत बालगंधर्व थिएटर्सने स्पर्धा गाजवली. (प्रतिनिधी)