गेट परीक्षेत फिनोलेक्स ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:32 AM2021-04-02T04:32:41+5:302021-04-02T04:32:41+5:30
रत्नागिरी : येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयामधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा विद्यार्थी कौस्तुभ सोनावणे याने गेट ...
रत्नागिरी : येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयामधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा विद्यार्थी कौस्तुभ सोनावणे याने गेट २०२१ च्या परीक्षेमध्ये संपूर्ण देशात ६९ वा क्रमांक प्राप्त केला आहे. त्याने हे देदीप्यमान यश ‘प्रोडक्शन ॲण्ड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग’ या विषयात मिळवले आहे. तसेच मेकॅनिकल विभागातील निनाद महाजन आणि तन्मय बापट यांनी सुद्धा या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर आयआयटीद्वारा घेण्यात येणारी गेट (ग्रॅज्युएट ॲप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग) ही एक आव्हानात्मक आणि अवघड परीक्षा मानली जाते.
फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, डीन तथा मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद किरकिरे, तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.