युवा महोत्सवामध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:33 AM2021-04-09T04:33:15+5:302021-04-09T04:33:15+5:30
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये यश मिळविलेल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले हाेते. लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी ...
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये यश मिळविलेल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ५३ व्या आंतर महाविद्यालय सांस्कृतिक स्पर्धा म्हणजेच युवा महोत्सवांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीमध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला यश प्राप्त झाले आहे. जिल्हास्तरावरून अंतिम फेरीमध्ये गेलेल्या आठ पैकी तीन स्पर्धांमध्ये पदक प्राप्त झाले आहे आणि संपूर्ण कोकणामध्ये सर्वाधिक पदक मिळविणारे महाविद्यालय ठरले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या ‘ऑन द स्पॉट पेंटिंग’ स्पर्धेत ओमकार कांबळे याला रौप्यपदक मिळाले, मिमिक्री स्पर्धेमध्ये शैलेश इंगळे याला रौप्यपदक मिळाले तसेच शास्त्रीय गीत गायन स्पर्धेमध्ये वैष्णवी जोशी हिला कांस्यपदक प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाच्या संपूर्ण सांस्कृतिक विभागाचे प्राध्यापक आणि व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या एकत्रित सहकार्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठे यश प्राप्त झाले आहे. कोरोनाच्या काळामुळे यावर्षी संपूर्ण युवा महोत्सव ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांची निवड वार्षिक झेप महोत्सवांमधून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचा नियमित सराव घेण्यात आला.
स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली महोत्सवामध्ये सहभाग घेण्यात आला होता. यासाठी प्रा. शुभम पांचाळ, प्रा. मधुरा दाते, विद्यार्थी सचिव बुशरा खान, सांस्कृतिक प्रतिनिधी प्रसाद साळवी यांनी मेहनत घेतली. या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्रभारी प्राचार्य प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे, डॉ. विवेक भिडे, डॉ. कल्पना आठल्ये यांनी विशेष अभिनंदन केले आहे.