तायक्वांदो स्पर्धेत गणराज तायक्वांदो क्लबचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:32 AM2021-03-27T04:32:11+5:302021-03-27T04:32:11+5:30
तायक्वांदाे स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या तायक्वांदाेपटूंसह प्रशिक्षक व अन्य मान्यवर उपस्थित हाेते. लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : खेड येथे पार ...
तायक्वांदाे स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या तायक्वांदाेपटूंसह प्रशिक्षक व अन्य मान्यवर उपस्थित हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : खेड येथे पार पडलेल्या १४ व्या क्योरोगी आणि ८ व्या पुमसे खुल्या तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी तालुक्याच्या मुलांनी पुमसेमध्ये सांघिक तृतीय पारितोषिक मिळवत अनेक पदकांवर आपले नाव कोरले. या स्पर्धेत गणराज तायक्वांदाे क्लबने यश मिळविले.
स्पर्धेत त्रिशा सचिन मयेकर, गौरी अभिजित विलणकर, आद्या अमित कवितके यांनी सुवर्णपदक पटकावले, तर श्रेष्ठा अभिजित विलणकर हिने कास्यपदक पटकावले. तसेच त्रिशा मयेकर हिने ‘बेस्ट फायटर’चा किताब मिळवला, स्मित किरला क्लबकडून उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच स्मित सुनील किर, आदिराज अमित कवितके, अर्थव राजेंद्र जामसेंडकर या खेळाडूंनी सहभाग नोंदविला हाेता. विजयी खेळाडूंचा नगरसेविका शिल्पा सुर्वे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या संघाला प्रशिक्षक म्हणून प्रियांका सुनील चव्हाण यांनी मार्गदर्शन केले, तर क्लबच्या प्रमुख प्रशिक्षिका आराध्या प्रशांत मकवाना सह-प्रशिक्षक अनिकेत पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.