सावर्डेनजीक तिघे बुडाले; दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:32 PM2017-08-28T23:32:36+5:302017-08-28T23:32:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सावर्डे (चिपळूण) : गणेश विसर्जनासाठी पºयाची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या अकरा तरूणांपैकी एका शाळकरी विद्यार्थ्यासह तिघेजण बुडल्याची घटना चिपळूण तालुक्यातील आबीटगाव येथे घडली. शंतनू शांताराम दुर्गवले (१४) आणि रोहीत तुकाराम दुर्गवले (२३) अशा दोघांचा मृतदेह हाती आला असून, संकेत शांताराम धावडे (२३) याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन उद्या मंगळवारी होत आहे. विसर्जनासाठी आबीटगाव ते तुरंबव हा पºया तसेच
गणेश विसर्जन घाट साफ करण्यासाठी आबीटगाव येथील अकरा तरूण सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गेले होते. गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे पºयाचे पाणी वाहत होते.
अकरा तरूणांपैकी तिघेजण साफसफाईसाठी पºयाच्या पाण्यात उतरले आणि उरलेले आठ तरूण गणपती ठेवण्यासाठीची जागा साफ करत होते.
त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या घटनेची माहिती कळताच सावर्डे पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.
गावावर शोककळा
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गावावर शोककळा पसरली आहे. ममुसळधार पावसातही बहुतांश ग्रामस्थ विसर्जन घाटावर दाखल झाले आहेत. पोलीस तसेच ग्रामस्थ तिसºया बेपत्ता तरूणाचा शोध घेत आहेत.
अचानक पाण्याचा वेग वाढल्यामुळे पºयात उतरून साफसफाई करणारे संकेत, शंतनू आणि रोहीत हे तिघेजण वाहून गेले. साफसफाई करणाºया तरूणांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी मदतीसाठी इतरांना बोलावले. लोकांनी या तिघांचाही कसून शोध घेण्यास सुरूवात केली. त्यात शंतनू आणि रोहीतचा मृतदेह हाती लागला आहेत. मात्र संकेत धावडे बेपत्ताच झाला आहे.