सावर्डेनजीक तिघे बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:36 PM2017-08-28T23:36:22+5:302017-08-28T23:36:22+5:30

Suddenly three bodies were found, both bodies were found | सावर्डेनजीक तिघे बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले

सावर्डेनजीक तिघे बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सावर्डे (चिपळूण) : गणेश विसर्जनासाठी पºयाची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या अकरा तरूणांपैकी एका शाळकरी विद्यार्थ्यासह तिघेजण बुडल्याची घटना चिपळूण तालुक्यातील आबीटगाव येथे घडली.
शंतनू शांताराम दुर्गवले (१४) आणि रोहीत तुकाराम दुर्गवले (२३) यांचे मृतदेह मिळाले असून, संकेत शांताराम धावडे (२३) याचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन उद्या मंगळवारी होत आहे. विसर्जनासाठी आबीटगाव ते तुरंबव हा पºया तसेच गणेश विसर्जन घाट साफ करण्यासाठी आबीटगाव येथील अकरा तरूण सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गेले होते. गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे पºयाचे पाणी वाहत होते. अकरा तरूणांपैकी तिघेजण साफसफाईसाठी पºयाच्या पाण्यात उतरले आणि उरलेले आठ तरूण गणपती ठेवण्यासाठीची जागा साफ करत होते.
साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक पाण्याचा वेग वाढल्यामुळे पºयात उतरून साफसफाई करणारे संकेत, शंतनू आणि रोहीत हे तिघेजण वाहून गेले. काठावर साफसफाई करणाºया तरूणांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी मदतीसाठी इतरांना बोलावले. मदतसाठी आलेल्या लोकांनी या तिघांचाही कसून शोध घेण्यास सुरूवात केली. त्यात शंतनू आणि रोहीतचा मृतदेह हाती लागला आहेत. मात्र संकेत धावडे बेपत्ताच झाला आहे. त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या घटनेची माहिती कळताच सावर्डे पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

गावावर शोककळा
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गावावर शोककळा पसरली आहे. ममुसळधार पावसातही बहुतांश ग्रामस्थ विसर्जन घाटावर दाखल झाले आहेत. पोलीस तसेच ग्रामस्थ तिसºया बेपत्ता तरूणाचा शोध घेत आहेत.

Web Title: Suddenly three bodies were found, both bodies were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.