साखरेच्या ट्रकची लातूर बसला जोरदार धडक,७ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 07:30 PM2021-02-01T19:30:36+5:302021-02-01T19:31:58+5:30
accident Ratnagiri- रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावर पाली-नाणीज दरम्यान अपघाताची मालिका सुरुच आहे. साखरेची पोती घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रत्नागिरी-लातूर एस.टी. बसला जोरदार धडक दिल्याची घटना नाणीज (ता. रत्नागिरी) येथे सकाळी ८.३० वाजता घडली. या अपघातात बसमधील ७ प्रवाशी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावर पाली-नाणीज दरम्यान अपघाताची मालिका सुरुच आहे. साखरेची पोती घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रत्नागिरी-लातूर एस.टी. बसला जोरदार धडक दिल्याची घटना नाणीज (ता. रत्नागिरी) येथे सकाळी ८.३० वाजता घडली. या अपघातात बसमधील ७ प्रवाशी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
क्षमतेपेक्षा जास्त साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या अपघाताची मालिका सुरु असल्याने पाली, नाणिज येथील स्थानिक रहिवाशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात बस आणि ट्रक दोन्ही गाड्या रस्त्यावर पलटी झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.
रत्नागिरीहून लातूरला जाणारी बस (एमएच २०, बीएल १२५४) ही सकाळी ७.३० वाजता १५ प्रवाशांना घेऊन निघाली. ही बस नाणीज येथे आली असता साखरेची पोती घेऊन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच १३, सीयु ४५७६) जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेने दोन्ही वाहने रस्त्यावर आडवी झाली. या अपघातामुळे कानटळ्या बसवणारा आवाज झाल्याने स्थानिक रहिवाशी घाबरले होते. या अपघातानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.