मंडणगड आगारातील गाळ्यांचे काम त्वरित थांबविण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:32 AM2021-03-17T04:32:42+5:302021-03-17T04:32:42+5:30

फोटो ओळी- बसस्थानकाचे परिसरातील गाळ्यांचे प्रश्नावर मंडणगड नगरपंचायत कार्यालयात गर्दी झाली हाेती. लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : मंडणगड बसस्थानकात ...

Suggestion to stop the work of cheeks in Mandangad depot immediately | मंडणगड आगारातील गाळ्यांचे काम त्वरित थांबविण्याची सूचना

मंडणगड आगारातील गाळ्यांचे काम त्वरित थांबविण्याची सूचना

Next

फोटो ओळी- बसस्थानकाचे परिसरातील गाळ्यांचे प्रश्नावर मंडणगड नगरपंचायत कार्यालयात गर्दी झाली हाेती.

लाेकमत न्यूज नेटवर्क

मंडणगड : मंडणगड बसस्थानकात विनापरवाना गाळ्यांचे बांधकाम सुरू आहे. याप्रकरणी स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कार्यवाही सुरू केली आहे. यासंदर्भात प्राधिकरणाने मंडणगडच्या आगार व्यवस्थापकांना पत्र देत उपरोक्त बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे व आवश्यक त्या मंजुरी मिळाल्यानंतरच नियमानुसार बांधकाम करण्यात यावे, असे सुचित केले आहे.

या विषयावर ग्रामस्थ वैभव कोकाटे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाड कार्यालयाकडे १३ मार्च २०२१ रोजी तक्रार अर्ज केला आहे. अर्जातील माहितीनुसार मंडणगड बसस्थानकाच्या आवारात परिवहन महामंडळाचे निविदेनुसार गाळे वितरित करून त्याचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असलेली जागा ही राजेवाडी - आंबडवे राष्ट्रीय महामार्गाच्या आर. ओ. डब्ल्यू.मध्ये समाविष्ट आहे. बांधकामामुळे मुख्य रस्त्यापासूनचे अंतर भविष्यात राखले जाणार नसल्याने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्राधिकरणाचा नाहरकत दाखला प्राप्त न करताच हे काम करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात तहसीलदारांकडे नागरिकांनी १२ मार्च २०२१ रोजी निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार नगरपंचायत, मंडणगड यांच्याकडून बांधकामाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तसेच दुकान गाळ्यांचा प्लॅन नगर रचना कार्यालयातून मंजूर करून न आणता परस्पर बांधकाम सुरु करण्यात आले आहे. याबाबत मुख्याधिकारी नगर पंचायत, मंडणगड यांच्या कार्यपध्दतीवरही निवेदनात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनावर राकेश साळुंखे, विनोद जाधव, वैभव कोकाटे, दिनेश साखरे, शब्बीर ओंबिलकर, काशीराम सापटे, तेजस बेर्डे यांच्या सह्या आहेत. याविषयासंदर्भात ग्रामस्थ तेजस बेर्डे यांनी उपविभागीय अधिकारी, दापोली यांच्याकडे तर तालुकावासियांनी १० मार्च २०२१ राेजी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे.

या निवेदनात बसस्थानकाच्या आवारातील सांडपाण्याची व स्वच्छतेची दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी नगरपंचायतीकडून संबंधितांना कळवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली असून, परस्पर बांधकाम सुरू झाल्यास मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर एकूण २६ नागरिकांच्या सह्या आहेत.

Web Title: Suggestion to stop the work of cheeks in Mandangad depot immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.