टाकेडेत मुलीची तळीत उडी मारून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:07 AM2018-08-06T05:07:36+5:302018-08-06T05:07:48+5:30
टाकेडे गावातील स्मिता नवृत्ती चाळके (१५) या मुलीने शनिवारी गावातील बाणशेत या तळीत उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार मंडणगड पोलीस स्थानकात देण्यात आली
मंडणगड : तालुक्यातील टाकेडे गावातील स्मिता नवृत्ती चाळके (१५) या मुलीने शनिवारी गावातील बाणशेत या तळीत उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार मंडणगड पोलीस स्थानकात देण्यात आली असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेसंदर्भात टाकेडे गावठाण येथील संदीप विठ्ठल साळुंखे यांनी मंडणगड पोलीस स्थानकात खबर दिली आहे. या माहितीनुसार मयत स्मिता ही ४ आॅगस्टला सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास काही न सांगता घरातून निघून गेली व ती घरी न परतल्याने तिचा आजबाजूच्या परिसरात शोध घेत असताना सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह गावातील बाणशेत तळीच्या पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगताना आढळून आला. याबाबतची माहिती मंडणगड पोलिसांना देण्यात आली.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक उत्तम पिठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मृत स्मिता हिच्या मृतदेहाचे विच्छेदन दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. रविवारी सकाळी तिच्या पार्थिवावर टाकेडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.