नवदाम्पत्याची कापडगावात आत्महत्या

By admin | Published: July 17, 2014 11:43 PM2014-07-17T23:43:29+5:302014-07-17T23:53:23+5:30

आत्महत्येमागचे कारण गुलदस्त्यात

Suicide of Navy's cotton plantation | नवदाम्पत्याची कापडगावात आत्महत्या

नवदाम्पत्याची कापडगावात आत्महत्या

Next

रत्नागिरी : तालुक्यातील पालीजवळील कापडगाव कुरतडकरवाडीत आज (गुरुवार) दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास नवदाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे खळबळ उडाली असून, या दाम्पत्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. प्रथमेश रमेश कुरतडकर (२७) व अर्पिता प्रथमेश कुरतडकर (२२) असे या पती-पत्नीचे नाव आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश व अर्पिता यांचे अलिकडेच लग्न झाले होते. नेहमीप्रमाणे आज प्रथमेशचे आई-वडील शेतावर कामासाठी गेले. या दोघांनीही त्यांना आपण दुपारी १२ वाजेपर्यंत शेतावर येऊ, असे सांगितले होते. मात्र, उशीर झाला तरी ते शेतावर का आले नाहीत, म्हणून वडील एक वाजण्याच्या सुमारास घरी आले.
घराचा दरवाजा बंद होता. त्याला आतून कडी लावलेली असल्याचे लक्षात आल्यानंतर रमेश कुरतडकर यांनी प्रथमेशला हाका मारल्या. बराचवेळ आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने वडील चिंतेत पडले. त्यानंतर दरवाजा उघडून त्यांनी घरात प्रवेश केला.
प्रथमेश व अर्पिता हे दोघेही बेडरुममध्ये घराच्या अ‍ॅँगलला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने त्यांना धक्काच बसला. त्यानंतर गावच्या पोलीसपाटील यांना घटनेची माहिती दिल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे पोलीस अधिकारी व पाली दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एन. पाटील अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Suicide of Navy's cotton plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.