अंधश्रद्धा हे बुद्धी चुकार लोकांचे विश्रामगृह : यशवंत मनोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:33+5:302021-07-14T04:36:33+5:30

रत्नागिरी : राजकारणात पुष्कळ अंधश्रध्दा असून, राजकारणी जाणीवपूर्वक अंधश्रद्धांचा पसार करतात. त्यात त्यांचे हित आहे. अंधश्रद्धा हा एक धर्ममान्य ...

Superstition is the resting place of people who are ignorant: Yashwant Manohar | अंधश्रद्धा हे बुद्धी चुकार लोकांचे विश्रामगृह : यशवंत मनोहर

अंधश्रद्धा हे बुद्धी चुकार लोकांचे विश्रामगृह : यशवंत मनोहर

Next

रत्नागिरी : राजकारणात पुष्कळ अंधश्रध्दा असून, राजकारणी जाणीवपूर्वक अंधश्रद्धांचा पसार करतात. त्यात त्यांचे हित आहे. अंधश्रद्धा हा एक धर्ममान्य आणि लोकमान्य धंदा बनला असून, ते बुद्धी चुकार लोकांचे विश्रामगृह आहे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मासिकाच्या ऑनलाईन प्रकाशनावेळी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नव्याने सुरू केलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ या ई-मासिकाचे ऑनलाईन प्रकाशन डॉ. यशवंत मनोहर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, मासिकाचे संपादक डॉ. नितीन शिंदे, कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड, डॉ. दीपक बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ. यशवंत मनोहर पुढे म्हणाले की, माणूस भयग्रस्ततेने परावलंबी होऊन बुद्धीपासून दूर जातो. मात्र, विचार करणारी बुद्धी ही मानवी अस्तित्वाचे सत्त्व आहे. ते सत्त्व गमावले की माणूस म्हणून जगण्यासारखे व्यक्तीकडे काही रहात नाही. मानसिकदृष्ट्या रुग्ण असलेला समाज जगण्याला पारखा झालेला असतो. अशा समाजाला स्वास्थ्यपूर्ण जगता येत नाही. त्यामुळे समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम आणि त्यांच्या मासिकातील चर्चा विश्व समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्र अंनिसचे काम हे देशाच्या मानसिक आरोग्यासाठीचे अभियान आहे, असे डॉ. यशवंत मनोहर म्हणाले.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काहीही फरक करता येत नाही. तर्काला मूठमाती दिल्यावर श्रद्धा जन्माला येते आणि तर्काची हत्या केल्यावर अंधश्रद्धा जन्माला येते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा तर्क, विज्ञान, बुद्धीप्रामाण्याला मानत नाहीत. त्यामुळे हे दोन्हीही एकच आहे, असे मत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.

या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमाचे सोशल मीडिया प्रसिद्धीचे काम राज्य पदाधिकारी अवधूत कांबळे, राज्य सरचिटणीस नितीन राऊत यांनी पाहिले. या कार्यक्रमात सहभागींनी उदंड प्रतिसाद दिला.

Web Title: Superstition is the resting place of people who are ignorant: Yashwant Manohar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.