शस्त्रक्रियेने मयुरला मिळाली पुन्हा दृष्टी
By admin | Published: October 27, 2014 09:05 PM2014-10-27T21:05:21+5:302014-10-27T23:46:32+5:30
तीन वर्षांच्या लहान मुलाला जन्मजात असलेल्या मोतिबिंदूचे स्पष्ट निदान
असगोली : गुहागर तालुक्यातील मोंबार पाचेरीसडा येथील मयुर गंगाराम पंड्ये (३) या लहान मुलाला जन्मजात असलेल्या मोतिबिंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्याची दृष्टी परत मिळवून दिल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोली व नॅब हॉस्पिटल, चिपळूणचे सर्वत्र कौतुक होत आहे.मयूर या तीन वर्षांच्या लहान मुलाला जन्मजात असलेल्या मोतिबिंदूचे स्पष्ट निदान प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. बागवान व नेत्रचिकित्सक डॉ. डी. डी. जोशी यांनी केले होते. त्यानंतर त्या मुलाला त्याची पूर्ववत दृष्टी परत मिळवून दिल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोली व नॅब हॉस्पिटल, चिपळूणचे सर्वत्र कौतुक होत आहे.मयूर या तीन वर्षांच्या लहान मुलाला जन्मजात असलेल्या मोतिबिंदूचे स्पष्ट निदान प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. बागवान व नेत्रचिकित्सक डॉ. डी. डी. जोशी यांनी केल्यानंतर त्या मुलाला त्याची पूर्ववत दृष्टी मिळावी म्हणून तत्काळ त्या मुलाचे सर्व संबंधित कागदपत्र तयार करुन त्याला नॅब हॉस्पिटल, चिपळूण येथे पाठवून तेथील लहान मुलांचे सर्जन डॉ. ऋषिकेश जोशी यांच्याकडून यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्याला आवश्यक लेन्स बसवून मयुरची दृष्टी पुन्हा मिळवून दिल्याबद्दल सर्व डॉक्टर्स व वैद्यकीय अधिकारी यांचे मयूरच्या आई-वडील व गावकऱ्यांकडून आभार मानण्यात आले.
गुहागर तालुक्यातील मोंबार पाचेरीसडा येथील मयुरला लहान वयातच मोतिबिंदूसारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागले मात्र मयूरच्या डोळ््यावर शस्त्रक्रिया केल्यानेच त्याला पुन्हा दृष्टी मिळाली. (वार्ताहर)