CoronaVIrus In Ratnagiri : दुकाने बंद विरोधात संगमेश्वरातील व्यापाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 06:20 PM2021-06-22T18:20:01+5:302021-06-22T18:22:48+5:30

CoronaVIrus In Ratnagiri : कंटेन्मेंट झोन आणि बाजारपेठेत अनिश्चित काळासाठी बंद याविरोधात संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी संगमेश्वर बाजारपेठेजवळ आलेले तहसीलदार सुहास थोरात आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांना मुंबई - गोवा महामार्गावरील सोनवी चौक येथे मंगळवारी घेराओ घातला. ​​​​​​​

Surround the chief executive officer of the traders in Sangameshwar against the closure of shops | CoronaVIrus In Ratnagiri : दुकाने बंद विरोधात संगमेश्वरातील व्यापाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराओ

CoronaVIrus In Ratnagiri : दुकाने बंद विरोधात संगमेश्वरातील व्यापाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराओ

Next
ठळक मुद्देदुकाने बंद विरोधात संगमेश्वरातील व्यापाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराओसंगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संगमेश्वर सोनवी चौक येथे व्यापारी आले एकत्र

देवरुख : कंटेन्मेंट झोन आणि बाजारपेठेत अनिश्चित काळासाठी बंद याविरोधात संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी संगमेश्वर बाजारपेठेजवळ आलेले तहसीलदार सुहास थोरात आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांना मुंबई - गोवा महामार्गावरील सोनवी चौक येथे मंगळवारी घेराओ घातला.

जिल्हाधिकारी यांनी संगमेश्वर तालुक्यातील पाच गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संतप्त झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतरही बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. याउलट अधिकच नियम कडक करण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत.

मंगळवारी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आणि तहसीलदार सुहास थोरात संगमेश्वरात बुरंबी येथे कोविड विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनासाठी येणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांना मिळाली़ संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संगमेश्वर सोनवी चौक येथे एकत्र आले आणि त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार यांना घेराओ घालत जाब विचारला.यावेळी व्यापारी सुशांत कोळवणकर यांनी व्यापाऱ्यांची होणारी फरफट आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळणारी वागणूक याबाबत सांगितले.

यावेळी बोलताना फारूक पठाण म्हणाले की, संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संयमी आहेत. मात्र, आता संयमाचा अंत झाला आहे. बुधवारपर्यंत निर्णय द्या, नाहीतर गुरुवारपासून दुकाने उघडतो, असे सांगितले. यावेळी व्यापारी संघाचे सचिव अनिल भिडे म्हणाले की , संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी कधीही आंदोलन केले नाही. मात्र, आंदोलन करण्यास भाग पाडू नका, असे सांगितले.
अन्यथा गुरुवारपासून बाजारपेठ सुरु

व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीचा पाढा वाचत बाजारपेठ सुरू करा, दुकाने उघडायला परवानगी दिली नाही तर गुरुवारपासून व्यापारी स्वतः दुकाने उघडतील. प्रशासनाने कारवाई केल्यास कारवाईला सामोरे जायला सर्व व्यापारी एकजुटीने तयार आहेत. अशा प्रकारचे निवेदन व्यापारी संघातर्फे यावेळी देण्यात आले.
 

Web Title: Surround the chief executive officer of the traders in Sangameshwar against the closure of shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.