विहिरीत पडलेल्या रानगव्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:27 PM2021-02-12T13:27:00+5:302021-02-12T13:28:11+5:30

forest department Rajapur Ratnagiri- राजापूर तालुक्यातील आंगले गावातील एका पडक्या विहिरीत रानगवा पडल्याची घटना बुधवारी घडली. राजापूर वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने रात्रीच गव्याला विहिरीतून सुखरुप बाहेर काढून त्याला जीवदान दिले.

Survival of the fittest | विहिरीत पडलेल्या रानगव्याला जीवदान

विहिरीत पडलेल्या रानगव्याला जीवदान

Next
ठळक मुद्देविहिरीत पडलेल्या रानगव्याला जीवदानगव्याला बाहेर काढण्यासाठी एका बाजूने खोदकाम

राजापूर : तालुक्यातील आंगले गावातील एका पडक्या विहिरीत रानगवा पडल्याची घटना बुधवारी घडली. राजापूर वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने रात्रीच गव्याला विहिरीतून सुखरुप बाहेर काढून त्याला जीवदान दिले.

तालुक्यातील आंगले गावी मनुष्यवस्तीपासून दूर सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ही विहीर आहे. काही ग्रामस्थ त्या विहिरीजवळून जात असता विहिरीतून आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता रानगवा असल्याचे कळले. आंगलेचे ग्रामपंचायत सदस्य योगेश प्रभुलकर यांनी याबाबतची माहिती राजापूर वन विभागाला दिली.

त्यानंतर राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे, चिपळूणचे रामदास खोत, वि. द. झाडे, राजापूरचे वनरक्षक सागर गोसावी, चिपळूण येथील फिरत्या पथकाचे परिक्षेत्र वन अधिकारी रमेश कांबळे, रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, दीपक खाडे हे आंगले येथे दाखल झाले. ग्रामपंचायत सदस्य योगेश प्रभुलकर, आयुब मीर, बाळा लाड या स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना मदत केली.

ही विहीर सुमारे बारा ते पंधरा फूट खोल असून, आतमध्ये तीन फूट पाणी असल्याने गव्याला बाहेर काढणे अवघड होते. त्यानंतर खोदलेल्या विहिरीत दगड टाकून आत अडकून पडलेल्या गव्याला बाहेर येण्यासाठी योग्य असा मार्ग बनविण्यात आला. हे काम सुरू असतानाच रानगवा आक्रमक होऊन तेथे असलेल्या मंडळींच्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानंतर तयार केलेल्या त्या पर्यायी मार्गाद्वारे आत पडलेला रानगवा विहिरीतून वर आला आणि जंगलाच्या दिशेने निघून गेला.

एका बाजूने खोदकाम

गव्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आला. मात्र, जेसीबी येण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले कर्मचारी व तेथे आलेल्या ग्रामस्थांसह त्या विहिरीच्या एका बाजूने खोदण्यास सुुरूवात केली.

Web Title: Survival of the fittest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.