पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवले

By admin | Published: September 25, 2016 12:55 AM2016-09-25T00:55:48+5:302016-09-25T00:55:48+5:30

संततधार पाऊस : कंट्रोल रुमला पुराच्या पाण्याचा वेढा

Survive the youth trapped in the yard | पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवले

पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवले

Next

देवरुख : गेले दोन दिवस पडणाऱ्या संततधार पावसाने संगमेश्वर तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर धामणीनजीक नदीच्या पुरामुळे एअरटेल कंपनीच्या कंट्रोल रुममध्ये अडकलेल्या तरुणाला शुक्रवारी राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जिकरीने बाहेर काढले.
संगमेश्वरनजीक धामणी गावातील ग्रामपंचायत कार्यालय बहुउद्देशीय सभागृहाच्या बाजूला एअरटेल कंपनीचा टॉवर असून, तेथे असणाऱ्या कंट्रोल रुममध्ये विनोद गुरव हा सुरक्षारक्षक अडकला होता. रुमच्या चहुबाजूने पाण्याचा वेढा असल्याने तो वाचविण्यासाठी धावा करीत होता. शुक्रवारी रात्री नदीला मोठा पूर आला होता. अखेर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ बाळकृ ष्ण बसवणकर यांनी एअरटेल कंट्रोल रुमच्या दिशेने झेप घेत गुरव यांच्यापर्यंत जाण्यात यश मिळविले. मात्र, याच दरम्यान वाढत्या पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढत गेल्याने उपस्थित ग्रामस्थांनी त्याला बाहेर येऊ नको, असा सल्ला दिला. याचवेळी देवरुखच्या राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमला देवरुख आपत्कालीन विभागाने हा सुरक्षारक्षक अडकल्याची माहिती दिली. आपत्कालीन विभागाची टीम ११ वाजेपर्यंत घटनास्थळी दाखल झाली. यावेळी राजा गायकवाड या धाडसी कार्यकर्त्याने मुख्य मार्गापासून अडकलेल्या तरुणापर्यंत जात मोठी जोखीम पत्करत त्याला सुरक्षित बाहेर काढले. राजा गायकवाड यांच्यासह गणेश जंगम, दिलीप गुरव, युुयुत्सू आर्ते, अण्णा बेर्डे, बंधू बेर्डे, सतीश खातू, राजू वणकुर्दे, वैभव आंबवकर, निरंजन बेर्डे, जयवंत वाईरकर, आदी कार्यकर्ते या बचाव मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी तहसील विभागाचे शैलेश जाधव, पंचायत समिती सदस्य रुपेश शेट्ये, मनसे तालुकाध्यक्ष अमित ताठरे उपस्थित होते.
तुरळ, कडवई, कुचांबे, कसबा, धामणी, आरवलीतील ग्रामपंचायत कार्यालयांसह येथील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. भिरकोंडमध्येदेखील पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)


 

Web Title: Survive the youth trapped in the yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.