हुश्येचे पोस्टर्स प्रेझेंटेशनमध्ये सुयश
By admin | Published: February 9, 2015 09:58 PM2015-02-09T21:58:19+5:302015-02-10T00:28:11+5:30
खारफूटी चर्चासत्र : किनाऱ्यावरील संशोधनावर भर
रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय व मॅनग्रोव्ह सोसायटी आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘खारफुटी’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रातील संशोधनात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या चांदनी जलील हुश्ये या विद्यार्थीनीने पोस्टर प्रेझेंटेशन प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळविला.‘कोकण किनाऱ्यावरील खारफुटी’ या विषयावर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात विविध स्तरावर शोधनिबंध सादर करण्यात आले. विद्यार्थी आणि प्राध्यापक विभागामध्ये ३८ शोधनिबंध सादर झाले. पोस्टर्स आणि पी. पी. टी. या दोन प्रकारामध्ये संशोधनाचे सादरीकरण करण्यात आले. मॅनग्रोव्ह सोसायटी आॅफ इंडियाच्यावतीने आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी या दोहोंच्यावतीने ‘संशोधन’ क्षेत्रातील उत्तम पोस्टर्स आणि पी. पी. टी. या प्रकारात पारितोषिके प्रदान करण्यात आली.मॅनग्रोव्ह सोसायटी आॅफ इंडियाच्यावतीने देण्यात आलेल्या पारितोषिकात विद्यार्थी गटातील सर्वाेत्तम पोस्टरचे पारितोषिक गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील चांदनी जलील हुश्ये या विद्यार्थीनीने पटकावले. ‘खारफुटीच्या अर्काचा डासांच्या अळीसाठी प्रतिबंधात्मक उपयोग’ (ट४’३्रस्र’ी ४२ी२ ङ्मा टंल्लॅ१ङ्म५ी स्र’ंल्ल३ ी७३१ंू३ ं२ ं स्री२३्रू्रीि ंँ्रल्ल२३ ेङ्म२०४्र३ङ्म ’ं१५ंी) या विषयावर तिने पोस्टर सादर केले.
चांदनी ही अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील उर्दू विषयाचे प्रा. जलील हुश्ये यांची कन्या आहे. या कार्यक्रमाच्या बक्षिस वितरण समारंभप्रसंगी मॅनग्रोव्ह सोसायटी आॅफ इंडियाचे डॉ. अरविंद उंटावले, चर्चासत्राचे समन्वयक डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. राजीव सप्रे, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. जी. एस. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्याहस्ते चांदनी हिला गौरवण्यात आले. (प्रतिनिधी)