विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी उपशिक्षक थोलबरे अखेर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 05:32 AM2018-08-05T05:32:57+5:302018-08-05T05:33:00+5:30
शाळेतील विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कौंढरकाळसूर रामाणेवाडी या शाळेच्या शिक्षकाला अखेर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी निलंबित केले़
रत्नागिरी : शाळेतील विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कौंढरकाळसूर रामाणेवाडी या शाळेच्या शिक्षकाला अखेर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी निलंबित केले़ जिल्हा परिषद शाळा कौंढर काळसूर रामाणेवाडी या शाळेतील चौथी इयत्तेत शिकणाºया विद्यार्थिनीबरोबर दि़ १२ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उपशिक्षक महादेव श्रीकृष्ण थोलबरे याने अश्लील चाळे केले होते़ यावेळी शिक्षक थोलबरे यांने त्या विद्यार्र्थिनीला शाळेतील संगणक कक्षात बोलावून हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला होता़ या प्रकरणानंतर गुहागर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती़ या शिक्षकावर कारवाईसाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी मोर्चा काढून फाशी देण्याची मागणी केली.
याप्रकरणी त्या विद्यार्र्थिनीच्या आईने गुहागर पोलीस स्थानक शिक्षक थोलबरे याच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती़ त्यानंतर पोलिसांनी थोलबरे याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता़ या प्रकरणानंतर त्याने गावातून पलायनही केले होते़ या प्रकरणांतर पोलीस कारवाई करतील या भितीने अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केले होते़
याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत जोरदार चर्चा झाली होती़ त्यावेळी थोलबरे याला तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्याने अश्लील चाळे केल्यामुळे इतर विद्यार्थिनीमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे़ थोलबरे याला महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४मधील भाग २ नियम ३ (१) मधील तरतूदीनुसार गैरवर्तन केल्याच्या तारखेपासून सेवेतून निलंबित करण्यात आले आहे़, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.