रत्नागिरीत 'गुढीपाडव्या'ला हिंदू एकतेचे दर्शन घडवत निघणार 'स्वागतयात्रा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:51 PM2022-03-25T12:51:32+5:302022-03-25T12:54:34+5:30

गेल्या १८ वर्षांत या स्वागतयात्रेमध्ये १५० हून अधिक संस्था, चित्ररथ सहभागी झाले. त्याचा आढावा घेण्यात आला. यावर्षी या स्वागत यात्रेत पंधरा ते वीस नवीन संस्था सहभागी होणार आहेत. यात्रा जल्लोषात व मोठ्या दणक्यात निघेल, आपण सारे हिंदू एक आहोत याचे दर्शन घडेल, अशी विराट यात्रा काढण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Swagatyatra will start with a vision of Hindu unity Gudipadva in Ratnagiri | रत्नागिरीत 'गुढीपाडव्या'ला हिंदू एकतेचे दर्शन घडवत निघणार 'स्वागतयात्रा'

रत्नागिरीत 'गुढीपाडव्या'ला हिंदू एकतेचे दर्शन घडवत निघणार 'स्वागतयात्रा'

Next

रत्नागिरी : श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदूकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था यांच्या माध्यमातून २ एप्रिलला हिंदू एकतेचे दर्शन घडवत हिंदू नववर्ष स्वागतयात्रा जल्लोषात काढण्यात येणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशभूषेत रत्नागिरीकर हिंदू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सुमारे ७५ संस्थांचे चित्ररथ, वाहने, ढोल, ताशापथके सामील होणार आहेत. यासंदर्भात रत्नागिरीतील पतितपावन मंदिर संस्थेत बैठक झाली.

या बैठकीला भैरी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे, उपाध्यक्ष राजन जोशी, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, नववर्ष स्वागत यात्रेचे संयोजक आनंद मराठे, पतितपावनचे माजी अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, कॅप्टन कोमल सिंग, मोहन भावे, संतोष पावरी, सुधाकर सावंत, मुकुंद जोशी, यांच्यासमवेत सुमारे १०० पुरुष, महिला भगिनी उपस्थित होत्या.

पुढील बैठक २९ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता पतितपावन मंदिरात आयोजित केली आहे. तसेच स्वागतयात्रा प्रचारासाठी दुचाकी फेरीचे नियोजन करण्यात येत आहे. स्वागतयात्रेत गुलाल उधळला जाणार नाही. हिंदू बांधव आपापल्या परिसरात सजावट, रस्त्यावर रांगोळी काढून स्वागत करणार आहेत.

गेल्या १८ वर्षांत या स्वागतयात्रेमध्ये १५० हून अधिक संस्था, चित्ररथ सहभागी झाले. त्याचा आढावा घेण्यात आला. यावर्षी या स्वागत यात्रेत पंधरा ते वीस नवीन संस्था सहभागी होणार आहेत. यात्रा जल्लोषात व मोठ्या दणक्यात निघेल, आपण सारे हिंदू एक आहोत याचे दर्शन घडेल, अशी विराट यात्रा काढण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

श्री भैरी मंदिरातून ९.३० वाजता यात्रेला सुरुवात हाेणार आहे. त्यानंतर श्री देव भैरी, खालची आळी, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, गोखले नाका, मारुती आळी, जयस्तंभ, राम आळी, राधाकृष्ण नाका, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात सांगता होईल. मारुती मंदिर येथूनही सकाळी ९.३० वाजता स्वागतयात्रा निघेल आणि ही यात्रा मूळ स्वागतयात्रेत जयस्तंभ येथे सामील होईल.

Web Title: Swagatyatra will start with a vision of Hindu unity Gudipadva in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.